नवरात्र दुर्गापूजा दसरा सणानिमित्त प्रतिबंधात्मक आदेश जारी*

 

*नवरात्र दुर्गापूजा दसरा सणानिमित्त*

*प्रतिबंधात्मक आदेश जारी*

 

§  *“माझे कुटुंब,माझी जबाबदारी या मोहिमेबाबत देखील जनजागृती करण्यात* *यावी*

§  *“ब्रेक द चेन अंतर्गत दिलेल्या सुधारित मार्गदर्शक सर्व सूचनांचे काटेकोरपणे* *पालन करावे.*

§  *नवरात्रोत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा.*

§  *घरगुती तसेच सार्वजनिक देवीच्या मूर्तीची सजावट करावी.*

§   *देवीच्या मूर्तीची उंची सार्वजनिक मंडळ करिता 4 फूट व घरगुती देवीच्या* *मूर्तीची उंची 2 फुटाच्या मर्यादित असावी.*

 

लातूर,दि.6 (जिमाका):- दिनांक 7  ते 15 ऑक्टोबर 2021 दरम्यान नवरात्र, दुर्गापूजा, दसरा सण साजरा करण्यात येत आहे.  कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली, तरी अजूनही  कोरोनाचा धोका कायम आहे, नागरिकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन उत्सव साजरा करणे उचित होणार नाही. नवरात्रोत्सव साजरा करताना सर्व नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टिकोनातून योग्य ती खबरदारी घेणे अत्यावश्यक असल्याने जिल्हादंडाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार संपूर्ण लातूर जिल्ह्याच्या हद्दीत दिनांक 7 ते 15 ऑक्टोबर, 2021 दरम्यान नवरात्र दुर्गापूजा, दसरा, सणाच्या संदर्भात पुढील प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

कोविड-19 च्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता महाराष्ट्र शासन महसूल व वन, आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभागाने   ब्रेक द चेन अंतर्गत दिलेल्या सुधारित मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करावे. सार्वजनिक नवरात्रोत्सवासाठी मंडळांनी, महापालिका, स्थानिक प्रशासन यांची त्यांच्या धोरणानुसार यथोचित पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता आणि महापालिका तसेच संबंधित स्थानिक प्रशासनाचे मंडपाबाबतचे धोरण यावेळी सुसंगत असे मर्यादित स्वरूपाचे मंडप उभारण्यात यावेत.

यावर्षीचा नवरात्रोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याच्या अनुषंगाने घरगुती तसेच सार्वजनिक देवीच्या मूर्तीची सजावट त्या अनुषंगाने करण्यात यावी. देवीच्या मूर्तीची उंची सार्वजनिक मंडळ करिता 4 फूट व घरगुती देवीच्या मूर्तीची उंची 2 फुटाच्या मर्यादित असावी. मागील वर्षीप्रमाणे शक्यतो देवीची मूर्ती ऐवजी घरातील धातू, संगमरवर आदि मूर्तींचे पूजन करावे. मूर्ती शाडूची, पर्यावरणपूरक असल्यास तिचे विसर्जन शक्यतो घरच्या-घरी करावे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास, कृत्रिम विसर्जन स्थळी विसर्जन करण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनाची समन्वय ठेवावा. नवरात्रोत्सवकरिता वर्गणी देणगी स्वच्छेने दिल्यास त्याचा स्वीकार करावा.  जाहिरातीच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही, असे पहावे.  

तसेच आरोग्यविषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यात पसंती देण्यात. यावी. तसेच माझे कुटुंब,माझी जबाबदारी या मोहिमेबाबत देखील जनजागृती करण्यात यावी.  गरबा, दांडिया व इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करू नयेत. त्याएैवजी आरोग्यविषयक उपक्रमे, शिबिरे ( उदा : रक्तदान)  आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे. आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी. देवीच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट, फेसबूक इत्यादीद्वारे उपलब्ध करून देण्याबाबत जास्तीत - जास्त व्यवस्था करण्यात यावी.

देवीच्या मंडपामध्ये प्रत्यक्ष येऊन दर्शन घेणाऱ्या भाविकांच्या बाबतीत शासन सार्वजनिक आरोग्य विभागाने ब्रेक द चेन अंतर्गत दिलेल्या सुधारित मार्गदर्शक सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. आरती भजन, कीर्तन या अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही. तसेच ध्वनी प्रदूषणासंदर्भातील  नियमांचे व तरतुदीचे पालन करण्यात यावे. मंडपात एकावेळी 5 पेक्षा जास्त कार्यकर्त्यांची उपस्थिती नसावी. तसेच मंडपामध्ये खाद्यपदार्थ अथवा पेयपाण्याची व्यवस्था करण्यास सक्त मनाई असेल. देवीच्या आगमन व विसर्जन मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. विसर्जनाच्या पारंपरिक पद्धतीत विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करून विसर्जन स्थळी  कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले आणि वरिष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्यादृष्टीने विसर्जन स्थळी जाणे टाळावे. संपूर्ण चाळीतील, इमारतीतील सर्व घरगुती देवीच्या मूर्तीच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रितरित्या काढण्यात येऊ नये.

महापालिका, विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था इत्यादींच्या मदतीने कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यात यावी. तसेच नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी स्थानिक प्रशासनाने प्रभाग समिती निहाय मूर्ती स्वीकृती केंद्राची व्यवस्था करावी. व याबाबत जास्तीत जास्त प्रसिद्धी देण्यात यावी.  विसर्जनाच्या तारखेस जर घरगुती तसेच सार्वजनिक नवरात्रोत्सव उत्सव मंडळाचा परिसर प्रतिबंधित क्षेत्रात असेल, तर मूर्ती विसर्जन सार्वजनिक ठिकाणी करण्यास मनाई असेल.  दसऱ्याच्या दिवशी करण्यात येणारा रावण दहनाचा कार्यक्रम हा सर्व नियम पाळून करावा. रावण दहनाकरिता आवश्यक तेवढ्या किमान व्यक्तीच कार्यक्रम स्थळी हजर राहतील. प्रेक्षक बोलावू नयेत.  त्यांना फेसबुक इत्यादी समाज माध्यमातून थेट प्रेक्षपणाद्वारे पाहण्याची व्यवस्था करावी.

कोविड-19 च्या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय, शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस स्थानिक प्रशासन यांनी  विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकात नंतर व प्रत्यक्ष उत्सव सुरू होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिद्ध झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे.

या आदेशाचे काटेकोरपणे अंमलबजावणी करून तात्काळ कार्यवाही करण्यात यावी. आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समूह भारतीय दंड संहिता 1860 सात रोग प्रतिबंधक कायदा 1897 फौजदारी  प्रक्रिया संहिता 1973 आपत्ती व्यवस्थापन अधिनियम- 2005, मधील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील. परंतु आदेशाची अंमलबजावणी करताना सद्भावनेने केलेल्या कृत्यासाठी तर त्यासाठी कोणत्याही अधिकारी कर्मचारी यांचे विरुद्ध कार्यवाही केली जाणार नाही, असेही आदेशात नमूद केले आहे

0000

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु