केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील जिल्हयातील सहा जणांचे यश लातूर जिल्हयातील अनेक युवकांना प्रेरणा देणारे --जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील जिल्हयातील
सहा जणांचे यश
लातूर जिल्हयातील अनेक युवकांना प्रेरणा देणारे
--जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.
पी.
§
*केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत जिल्ह्यातील गुणवंताचा
जिल्हाधिकारी यांच्या हस्ते गौरव*
लातूर,दि.22(जिमाका):- केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या
परीक्षेत लातूर जिल्ह्यातील युवक, युवती यांनी उज्वल यश संपादन केले आहे. हे सहा जणांचे यश म्हणजे जिल्हयातील अनेक
युवकांना प्रेरणा देणारे तसेच लातूर जिल्ह्याचा
गौरव वाढविणारे असल्याचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी जिल्हाधिकारी
कार्यालयात युपीएससी परीक्षेत यशस्वी झालेल्या गुणवंताच्या सत्कार दरम्यान हे गौरवोद्गार
काढले.
जिल्ह्यातील युवक, युवतींना अधिक प्रेरणा मिळावी म्हणून या सर्वांचे
जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या आणि जिल्हा माहिती कार्यालय, लातूर फेसबुक
लाईव्ह आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी
अधिकारी अभिनव गोयल, अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे आदि विविध विभागाच्या विभाग
प्रमुखांची यावेळी उपस्थिती होती.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत लातूर जिल्ह्यातील यशस्वी
झालेल्या सर्व उमेदवारांचे अभिनंदन करुन भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच
प्रत्येक व्यक्तीच्या यशस्वीतेसाठी आई,वडिल, बहिण, मित्र परिवार व नातेवाईंकाची
मेहनत व आशिर्वाद असते. स्पर्धा परीक्षा सहज सोपी नसली तरी सकारात्मकता हे या यशाचा
मंत्र आहे. देशातील 5 ते 10 लाख उमेदवार
या स्पर्धा परीक्षेची तयारी करुन परीक्षा देत असतात. केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षेत
यश पहिल्या प्रयत्नात मिळत नसते. लातूर जिल्ह्यातील सहा विद्यार्थ्यांनी केंद्रीय
लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळविले आहे. ही परीक्षा देण्यासाठी पेशंन्सची खुप
आवश्यकता असते. ज्यांना पेशंन्स , मेहनत, जिद्द व चिकाटीची आवश्यकता असते. यातूनच परीक्षेची
लढाई आपल्याला जिंकता येते, असेही जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. म्हणाले .
कु. पूजा कदम रँक -577, विनायक प्रकाशराव महामुनी रँक -95, कमलकिशोर देशभूषण कंडारकर रँक -137 या तीन केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन केलेल्या यशस्वीतांचा लातूर जिल्ह्याची समग्र पर्यटनाविषयीची माहिती असलेलली “ वैभवशाली लातूर जिल्हा पर्यटन पुस्तिका ” शाल, पुष्पगुच्छ,पेन देवून गौरविण्यात आले. या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात या तिन्ही परीक्षेत यशस्वी झालेल्या यशस्वीतांचे अनुभवही या माध्यमाद्वारे व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन लातूर जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी केले.
Comments
Post a Comment