संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे यांचा लातूर जिल्हा दौरा
संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे
यांचा लातूर जिल्हा दौरा
लातूर,दि.14(जिमाका):-राज्याचे पर्यावरण, पाणीपुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम
(सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन व संसदीय कार्य राज्यमंत्री संजय
बनसोडे
हे लातूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
शुक्रवार दिनांक 15 ऑक्टाबर 2021 रोजी सकाळी 6.30 वा.
रेल्वे स्टेशन, लातूर येथे आगमन, निवासस्थानी मोटारीने प्रयाण व राखीव. सकाळी 9.30 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क,
टाऊन हॉल, लातूर येथे धम्मचक्र प्रवर्तन
दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंतीस उत्सव समितीच्या वतीने
ध्वजारोहण. सकाळी 10.00 वाजता लातूर येथून मोटारीने शिरुर अनंतपाळकडे प्रयाण.
सकाळी 11.00 वा. बसवेश्वर चौक, शिरुर अनंतपाळ येथे सकाळ कृषी ॲग्रोवन मार्टच्या
उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. सोईनुसार लातूरकडे मोटारीने प्रयाण.
****
Comments
Post a Comment