शासकीय, निमशासकीय कार्यालय प्रमुखांनी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्याचे आवाहन -अधिष्ठता डॉ.सुधीर देशमुख

 


शासकीय, निमशासकीय कार्यालय प्रमुखांनी

रक्तदान शिबीराचे आयोजन करण्याचे आवाहन

                              -अधिष्ठता डॉ.सुधीर देशमुख

 

          लातूर,दि.5 (जिमाका):- जिल्हयातील सामाजिक विविध संस्था विविध संघटना, मित्र मंडळ, लायन्स क्लब, मॉल्स, धार्मिक संस्थान, राजकीय पक्ष संघटना, शाळा , महाविद्यालय, रार्ष्टीय सेवा योजना व विविध शासकीय / निमशासकीय कार्यालय प्रमुखांनी रक्तदान आयोजन करुन सहकार्य करण्याचे आवाहन विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय लातूर रक्तपेढीच्या वतीने अधिष्ठता डॉ.सुधीर देशमुख यांनी केले आहे.

      विलासराव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय लातूर येथे दरवर्षीप्रमाणे 1 ऑक्टोबर हा राष्ट्रीय स्वैच्छिक रक्तदान दिन साजरा केला जातो. तसेच एक ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर संपूर्ण महिना हा ऑक्टोबर ड्राइव्ह म्हणून साजरा केला जाणार आहे. महाविद्यालयाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यामध्ये प्रामुख्याने रक्तदान शिबीर, व्याख्यानमाला, घोषवाक्य, रांगोळी स्पर्धा निबंध स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, इत्यादींच्या माध्यमातून जनजागृती व रक्तदानाचे महत्व रक्तदात्यांना पटवून देण्याचे काम केले जाते.

        रक्तदानाचे महत्व, रक्तदानाबद्दलचे गैरसमज, रक्तदान केल्याने होणारे फायदे तोटे याबाबतची सविस्तर माहिती आपणास पूढील प्रमाणे देण्यात येत आहे.

       भारतात थॅलेसेमिया, हिमोफेलिया, सिकल सेल, अनेमिया यासारख्या आजारांचे रुग्ण्‍ मोठया प्रमाणात आहेत.अशा रुग्णांच्या शरीरामध्ये रक्तपेशी तयार होत नाहीत. त्यामुळे त्यांना वारंवार रक्ताची गरज भासते. ही गरज रक्तदानामुळे भागवता येते. तसेच भारतातील महिलांमध्ये रक्तातील लोहाचे प्रमाण फार कमी होत चालले आहे म्हणून गर्भवती स्त्रियांना रक्ताची गरज मोठया प्रमाणात भासत आहे. तसेच बाळंतपणा मध्ये रक्तस्त्राव झाल्यास मोठया प्रमाणात रक्त लागते. तसेच कॅन्सर पिडित, अपघात झालेल्या इतर मोठया शस्त्रक्रियांसाठी रक्ताची गरज भासत असते.

        रक्तदानाबाबत गैरसमज :- रक्तदान केल्यानंतर अशक्तपणा येईल का ? मुळीच नाही तुमच्या शरीरात एकूण साधारण पाच ते सहा लिटर रक्त असते. त्यापैकी केवळ तुम्ही पाच टक्के रक्त देता. आपण दिलेल्या रक्तापैकी पूर्ण रक्त चोवीस तासांत शरीरात पुन्हा तयार होते. त्यामुळे तुम्ही आपले दैनंदिन काम करु शकता.विश्रांती घेण्याची गरज भासत नाही.

       रक्तदान दिल्याने काय फायदा :- कोणतेही दान हे एक पुण्यकर्म आहे. रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे. कारण त्यामुळे आपण एखादयाचा जीव वाचवतो हे समाधान रक्तदान करुन आपण अनुभवास मिळते. आपण दिलेले रक्त हे ज्या रुग्णांचे नातेवाईक नाही अशा रुग्णांना दिले जाते तसेच नियमितपणे थॅलेसेमिया, हिमोफेलिया, अमेमिया, कॅन्सर, एड्स, टीबी व ऑपरेशनच्या रुग्णांना फायदा होतो.

        रक्तदान कोण करु शकतो :- 18 ते 60 वर्षाच्या आतील व वजन पन्नास किलोच्या पुढील व्यक्तीस करता येते. हिमोग्लोबिन 12.5 ग्रामच्या वर असले तरच तुमचे रक्त घेतले जाते नजीकच्या काळात तुम्हाला काही आजार येऊन गेला असेल तर डॉक्टरांना आठवणीने आजाराची माहिती द्या. तुमचे रक्त ज्यांना दिले जाते त्यांच्या हिताचे आहे. निरोगी मनुष्यच रक्तदान करु शकतो.

          रक्तदान करा व जगाचे स्पंदन कायम ठेवा :-शासकीय रक्तपेढी मार्फत सर्व रुग्णांना अगदी मोफत / विनाशुल्क रक्त पुरवठा केला जातो. तसेच रक्तदाता कार्ड वर महाराष्ट्रा मधील कुठल्याही शासकीय रक्तपेढी मध्ये रुग्ण्‍ कुठेही दाखल असला तरी उपलब्ध्‍ असल्यास मोफत रक्त मिळते. तसेच रक्तदान प्रमाणपत्र, संयजोक प्रमाणपत्र यांचा लाभ शासनाच्या विविध योजने मध्ये विद्यार्थी व संस्थांना मिळू शकतो

      या कार्यक्रमाचे उद्घाटन व रक्तदात्याचा सत्कार डॉ. संतोषकुमार डोपे वैद्यकीय अधिक्षक यांचे हस्ते करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी डॉ.दळवे के.टी. डॉ. पावर, डॉ. अंकिता, श्रीमती नोगजा, समाज सेवा अधिक्षक सुर्यवंशी सुरेंद्र, री. चौधरी सिध्देश्वर , गिरीश मुसांडे व श्री सुर्यवंशी आधीपरिचारक, श्री रामदासी, श्री स्वामी रक्ततेढी तंत्रज्ञ, विराज साबळे व इतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील रक्तपेढीच्या माध्यमातून सिध्दश्वर चौधरी, समाजसेवा अधिक्षक 963885774 तसेच गिरीश मुसांडे जनसंपर्क अधिकारी 9284152626 यांच्याशी संपर्क साधून सहकार्य करावे.

 

                                                          ****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु