जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय कार्यालयात मास्क वापरणे बंधनकारक जिल्हाधिकाऱ्यांनी केले आदेश जारी

 

जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय कार्यालयात मास्क वापरणे बंधनकारक

जिल्हाधिकाऱ्यांनी केले आदेश जारी

 

लातूर,दि.29 (जिमाका) राज्यात साथरोग प्रतिबंध अधिनियम 1897 व आपत्ती निवारण कायदा, 2005  अंमलबजावणी सुरु आहे.ज्याअर्थि, कोविड-19 प्रादुर्भावामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊन अंतर्गत लावण्यात आलेल्या निर्बंधामध्ये रुग्ण्‍ संख्या आटोक्यात येत असतांना अर्थचक्रास चालना देण्यासाठी निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली. त्यामुळे गर्दी व्यवस्थापन, शारीरिक अंतर पाळणे व मास्कचा वापर करण्यामध्ये नागरिकांकडूकन शिथिलता व निष्काळजीपणा झाल्याने राज्याला कोविड-19 बाधेच्या तीव्र लाटेचा सामना करावा लागला. त्यामुळे आता शासकीय, निमशासकीय कार्यालयात मास्क वापरणे बंधन कारक केले आहे.त्या संदर्भातील आदेश जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी आज काढले आहेत.

राज्यातील सर्व शासकीय / निमशासकीय व खाजगी व औद्योगिक आस्थापनांमध्ये मास्कचा वापर बंधनकारक करणे तसेच कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण तातडीने पूर्ण तातडीने पूर्ण करण्याबाबत शासन आदेश प्राप्त झाले आहेत.याबाबत आदेश निर्गमित करण्याची बाब जिल्हा प्राधिकरणाच्या विचारधीन होती.

त्याअर्थी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे पृथ्वीराज बी.पी. यांनी कोविड -19 बाधेच्या लाटेची द्विरुक्ती टाळण्यासाठी प्राप्त अधिकाराचा वापर करुन पूढील प्रमाणे आदेश पारित केले आहे.

जिल्हयातील सर्व अधिनस्त सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालये व खाजगी आस्थापनामध्ये कार्यरत अधिकारी / कर्मचारी तसेच कार्यालयात कामकाजास्तव येण्याच्या सर्व अभ्यागतांनाही कार्यालय व कार्यालयाच्या आवारात नाक व तोंड पूर्णत: झाकले जाईल अशा पध्दतीने मास्क वापरणे बंधनकारक राहील.

जिल्हयातील सर्व शासकीय / निमशासकीय कार्याक्लये व खाजगी आस्थापनामध्ये कार्यरत अधिकारी / कर्मचारी यांच्या कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा पूर्ण झाल्याची खातरजमा संबंधित कार्यालयाच्या कार्यालय प्रमुख/ आस्थापना प्रमुख यांनी करावी व कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण झाल्याचे अंतिम प्रमाणपत्र संबंधित अधिकारी / कर्मचाऱ्यांकडून प्राप्त करुन घ्यावे.ज्या कर्मचाऱ्यांचे लसीकरणासाठी काही अडचण असल्यास नजीकच्या लसीकरण केंद्रात किंवा सार्वजनिक आरोग्य विभागात संपर्क करुन कार्यालयीन अधिकारी / कर्मचाऱ्यांसाठी लसीकरणाचे विशेष सत्र आयोजित करावे.जेणेकरुन सर्व अधिकारी / कर्मचारी यांचे लसीकरण पूर्ण होईल्‍ याची खातरजमा करावी.

सर्व प्रकारच्या कार्यालयीन आस्थापनांनी दैनंदिन कामकाजादरम्यान मास्कचा सुयोग्य वापर तसेच लसीकरण पूर्ण करुन घेणे. यावर देखरेख करण्यासाठी संबंधित विभाग प्रमुख कार्यालय प्रमुख हे आस्थापना अधिकारी किंवा एका अधिकाऱ्याला नामनिर्देशित करतील.सर्व कार्यालय व कार्यालयाच्या आवारात अभ्यागतांसह मास्कचा वापर अनिवार्य करण्यात येत असल्याने विनामास्क वावरणाऱ्या अभ्यागत / कर्मचारी / अधिकारी यांना संबंधित अभ्यागत / कर्मचारी / अधिकारी ज्या विभागाच्या क्षेत्रात / आवारात विनामास्क आढळला त्या कार्यालयाच्या नामनिर्देशित अधिकारी कार्यालय प्रमुखाने नामनिर्देशित केलेला अधिकारी दंड करण्यास सक्षम प्राधिकारी राहील.

सक्षम प्राधिकारी विनामास्क आढळणाऱ्या अभ्यागत / कर्मचारी / अधिकाऱ्यांना दंड आकारणी करुन त्याबाबतची पावती देईल. सक्षम प्राधिकारी सदर दंडाची रक्कम संबंधित कार्यालयाच्या आहरण व संवितरण अधिकाऱ्यांकडे जमा करेल व आहरण व संवितरण अधिकारी सदर दंडाची रक्क्म खाली नमुद केलेल्या लेखाशीर्षाखालील असलेल्या जमा सांकेतांकाखाली भरणा करेल.

महसूल जमा (सी) इतर कराव्यतिरिक्त महसूल (एक) सर्वसाधारण सेवा 0070- इतर प्रशासनिक सेवा 800 - इतर जमा रक्कम राहील.

 

                                                   ****

 

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा