मौजे साखरा, ममदापूर,साई, तांदुळवाडी,आर्वी,तांदुळजा येथे भव्य कायदेविषयक शिबीर संपन्न
मौजे साखरा, ममदापूर,साई, तांदुळवाडी,आर्वी,तांदुळजा
येथे भव्य कायदेविषयक शिबीर संपन्न
लातूर,दि.29
(जिमाका) मा. सर्वोच्च न्यायालय व मा. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार
दि. 02 ऑक्टोबर 2021 ते दि. 14 नोव्हेंबर 2021 या कालावधीमध्ये आजादी का अमृत महोत्सव
या कार्यक्रमानिमित्त लातूर जिल्हयामध्ये गावोगावी कायदेविषयक जनजागृती शिबीराचे आयोजन
करण्यात आले आहे.
कायद्यायाची जनजागृती करण्यासाठी मौजे
साखरा,ममदापूर,साई,तांदुळवाडी, आर्वी व तांदुळजा येथे नुकतेच भव्य कायदेविषयक शिबीर
घेण्यात आले.या कार्यक्रमास साखरा येथे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गावचे उपरसपंच
तुकाराम ज्ञानदेव गोडसे हे आवर्जुन उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून व मार्गदर्शक
म्हणुन विधी शाखेचे विद्यार्थी प्रतिक्षा तरकसे,राहुल चेबळै,आशिष बालाजी कुटवाडे,बळीराम
कानवटे हे होते. प्रतिक्षा तरकसे यांनी वैकल्पिक वाद निवारण या विषयावर मार्गदर्शन
उपस्थित केले. राहुल चेबळे यांनी विधी सेवा
प्राधिकरण याबद्दल माहिती दिली.
तसेच आशिष बालाजी कुटवाडे यांनी ज्येष्ठ
नागरिक कायदा याविषयी सविस्तर असे विवेचन गावकऱ्यांना केले व बळीराम कानवटे यांनी लोकअदालत
या विषयावर अतिशय सखोल अशी माहिती दिली. येथील कार्यक्रमाचे प्रास्ताविक आशिष कुटवाडे
यांनी केले तर सुत्रसंचालन श्रीमंत बनसोडे, ग्रामसेवक यांनी केले व आभार विधी शाखेचा
विद्यार्थी अजय चौधरी यांनी केले.कार्यक्रमास ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील
नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
ममदापूर येथे कार्यक्रमाच्या अध्यक्ष
म्हणुन गावचे सरपंच पासमे चंद्रकांत हे उपस्थित होते.प्रमुख पाहुणे म्हणुन जिल्हा विधी
सेवा प्राधिकरणाचे पॅनल ॲड. छाया मलवाडे यांनी कौटुंबिक हिंसाचार मार्गदर्शन केले.पॅनल
ॲड. सुनैना बायस यांनी ज्येष्ठ नागरिक कायदा यावर मार्गदर्शन केले. विधी स्वयंसेवक
पृथ्वीसिंह बायस यांनी लोकअदालत या विषयी माहिती दिली. तसेच विधी शाखेची विद्यार्थीनी
भालेराव मयुरी सुभाष यांनी महिलांचे अधिकार या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे
प्रास्ताविक व सुत्रसंचालन गावचे शिक्षक दिनकर पासमे यांनी केले तर आभार विधी शाखेचा
विद्यार्थी चैतन्य मोरे यांनी केले.या कार्यक्रमास गावातील नागरिक,सरपंच,ग्रामसेवक
आदी उपिस्थत होते. कायदेविषयक शिबीर यशस्वी होण्यासाठी ग्रामसेवक,सरपंच,उपसरपंच यांनी
विशेष सहकार्य केले.
साई येथे या कार्यक्रमाला अध्यक्षा म्हणून
गावचे सरपंच सौ. सुमित्रा माने या होत्या. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते व मार्गदर्शक
म्हणुन विधी शाखेचे विद्यार्थी शुभम येलशेट्टे यांनी लिंग समानता याविषयावर अत्यंत
महत्वाचे मार्गदर्शन केले. तसेच आकाश मदने यांनी ज्येष्ठ नागरिक कायदा या विषयांवर
माहिती दिली.श्रीनिवास जिवनराव फुलसे यांनी महिला अत्याचार याविषयावर मार्गदर्शन केले
तसेच ललित गायकवाड यांनी शिक्षणाचा अधिकार यावर मार्गदर्शन करताना कायद्याचे शिक्षण
घेणे ही अत्यंत महत्वाचे आहे असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विधी शाखेचे विद्यार्थी
श्रीनिवास फुलसे यांनी केले तर सुत्रसंचालन अमोल पवार, उपसरपंच यांनी केले व आभार ग्रामसेवक,
परमेश्वरे आर.एस.यांनी केले. यावेळी गावातील ग्रामस्थ,आशा कार्यकर्त्या,ग्रामपंचायत
सदस्य उपस्थित होते.
तांदुळवाडी येथील कार्यक्रमाला अध्यक्षा
म्हणून गावचे सरपंच सौ. मनिषा मरे या होत्या. तर प्रमुख वक्ते म्हणुन विधी शाखेचे विद्यार्थी
संतोष कुलकर्णी हे होते. मार्गदर्शन करताना बालकांचे अधिकार या विषयावर सविस्तर असे
मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक श्रीमती सविता इरे यांनी
केले. सदरील कार्यक्रमास गावचे सरपंच, आशा कार्यकर्त्यां,अंगणवाडी सेविका,ग्रामस्थ
व महिला उपस्थित होते.
आर्वी च्या शिबीरास कार्यक्रमाचे अध्यक्ष
म्हणून गावचे उपसरपंच सचिन सुरवसे तर प्रमुख पाहूणे व मुख्य मार्गदर्शक म्हणुन तौफिक
तांबोळी, शुभम बिराजदार, सुनिल गायकवाड, प्रियंका देशपांडे, निकीता चव्हाण हे विधी
शाखेचे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमात कायद्याचे महत्व पटवून देताना तौफिक तांबोळी
यांनी वैकल्पि वाद निवारण मार्ग या विषयावर अतिशय सविस्तर असे मार्गदर्शन केले तसेच
शुभम बिराजदार यांनी शिक्षणाविषयी शासनाच्या विविध योजना सांगून त्याचे महत्व पटवुन
दिले व कायदेविषयक शिक्षणाची गरज आहे हे ही सांगितले. सोबतच सुनील गायकवाड यांनी विधी
सेवा प्राधीकरण याविषयावर मार्गदर्शन केले.प्रियंका देशपांडे, निकीता चव्हाण यांनी
नागरिकांच्या प्रश्नांचे जागीच निराकरण केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व प्रास्ताविक
नवनाथ ज्योतीराम नरवडे, लिपीक यांनी केले व आभार शेख एस.आर. यांनी मांडले. सदरील कार्यक्रमास
गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, गावकरी येथे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी
ग्रामसेवक व सरपंच यांनी विशेष सहकार्य केले.
तांदुळजा गावात कायद्याचे महत्व जनतेला
पटवून देण्यासाठी या ठिकाणी कायदेविषयक शिबीर घेण्यात आले यावेळी या कार्यक्रमाच्या
अध्यक्षा म्हणून गावच्या सरपंच विनीता शिवाजी बावणे या होत्या.तर प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक
म्हणुन पॅनल ॲड. सुरेश सलगरे यांनी जादुटोना व महिलांचे अधिकार विषयी व जिल्हा विधी
सेवा प्राधिकरण विषयी इत:भूत माहिती दिली. ॲड.अशोक जोंधळे यांनी बालकांचा शिक्षणाचा
अधिकार 2009 व शिक्षणाचे महत्व याविषयी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास तांदुळजा, कानडीबारेगाव
तसेच मसला येथील सरपंच, ग्रामसेवक, गावातील जेष्ठ नागरिक, ग्रामपंचायतचे सदस्य,गावातील
महिलाव ग्रामस्थ उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ग्रामपंचायतचे सदस्य, गावातील
महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ग्रामपंचायतचे सदस्य,सचिन
कांबळे यांनी केले व प्रास्ताविक वाकचौरे यांनी केले तर आभार प्रदर्शन मसला गावचे सरपंच
आल्टे यांनी केले.
तसेच हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, लातूर येथील न्यायिक कर्मचारी व दयानंद विधी महाविद्यालयाचे
विद्यार्थी तसेच उपरोक्त गावातील ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, आशा कार्यकर्त्या यांनी
विशेष परिश्रम घेतले व कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न केला.
****
Comments
Post a Comment