जिल्हयातील द्राक्ष, केळी, डाळिंब व आंबा फळ पिकासाठी विमा योजना लागू,पपई पिकाचा नव्याने समावेश
जिल्हयातील द्राक्ष,
केळी, डाळिंब व आंबा फळ पिकासाठी विमा
योजना
लागू,पपई पिकाचा
नव्याने समावेश
लातूर दि.12(जिमाका):-
आंबिया बहार 2021 मध्ये द्राक्ष, केळी, डाळिंब,आंबा व पपई या पिकासाठी पुर्नरचित हवामान आधारीत फळपिक विमा योजना लातूर जिल्हृयामध्ये अधिसूचित तालुक्यातील अधिसूचित महसूल मंडळामध्ये राबविण्यात येत आहे.
या योजना कार्यान्वित करणारी विमा कंपनी शासनाच्या महावेध प्रकल्पांतर्गत स्थापन केलेल्या हवामान केंद्र येथे नोंदवल्या गेलेल्या हवामानाच्या तपशीलानुसार विमा योजनेत भाग घेतलेल्या शेतकऱ्यांना परस्पर नुकसान भरपाई देईल.
जिल्हृयामध्ये सदर योजना एच.डी.एफ.सी.अर्गो जनरल इन्शूरन्सं कपंनी मुंबई या विमा कंपनीमार्फत कार्यान्वीत केली जात आहे.
जिल्हृयातील अधिसूचित फळपिके व महसूल मंडळ तालूका, द्राक्ष, आंबा, केळी, डाळिंब व पपई पूढील प्रमाणे
आहेत.लातूर- द्राक्ष लागू नाही. आंबा सर्व
महसूल मंडळे, केळी लागू नाही. डाळिंब तांदूळजा, मुरुड व पपई लागू नाही. औसा- द्राक्ष
औसा, लामजना, किनीथोट, किल्लारी, बेलकूंड, भादा, आंबा सर्व महसूल मंडळे, केळी किल्लारी ,मातोळा, डाळिंब-
औसा, लामजना, किनीथोट, किल्लारी, बेलकूंड, भादा, उजनी, पपई- उजनी, निलंगा- द्राक्ष निलंगा, औराद
श., अंबूलगा, कासार बालकूंदा, आंबा सर्व महसूल मंडळे, केळी लागू नाही. डाळिंब- निलंगा
औ. श. पपई- लागू नाही. रेणापूर- द्राक्ष- कारेपूर, आंबा- सर्व महसूल मंडळे, केळी- लागू
नाही, डाळिंब- कारेपूर, पपई- लागू नाही.शि.अनंतपाळ-द्राक्ष लागू नाही. आंबा- सर्व महसूल
मंडळे, केळी- लागू नाही. डाळिंब लागू नाही. पपई लागू नाही.
उदगीर-द्राक्ष-
मोघा, देवर्जन, आंबा- सर्व महसूल मंडळे, केळी- लागू नाही. डाळिंब नागलगाव, हेर. पपई
देवर्जन. अहमदपूर-द्राक्ष लागू नाही.आंबा सर्व महसूल मंडळे,केळी लागू नाही.डाळिंब अहमदपूर,
पपई हाडोळती. चाकूर- द्राक्ष- नळेगाव, शेळगाव, आंबा सर्व महसूल मंडळे, केळी लागू नाही.डाळिंब-
चाकूर,नळेगाव,वडवळ ना. पपई लागू नाही.जळकोट- द्राक्ष लागू नाही.आंबा सर्व महसूल मंडळे,केळी
लागू नाही.डाळिंब लागू नाही, पपई लागू नाही. देवणी द्राक्ष लागू नाही, आंबा सर्व महसूल
मंडळे,केळी लागू नाही. डाळिंब लागू नाही पपई लागू नाही.
द्राक्ष
अंतिम दिनांक 15 ऑक्टोबर 2021, आंबा दि. 31 डिसेंबर 2021, केळी 31 ऑक्टोबर 2021 डाळिंब
दि. 14 जानेवारी 2022 व पपई दि. 31 ऑक्टोबर 2021 विमा संरक्षीत रक्कम- द्राक्ष-
320000/- आंबा- 140000/- केळी- 140000/- डाळिंब- 130000/- पपई – 35000/- शेतकऱ्यांनी
भरावयाची विमा हप्ता- द्राक्ष- 16000/- आंबा-7000/-केळी-7000/- डाळिंब-6500/- पपई-
1750/-
कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना या योजना ऐच्छिक असून कर्जदार शेतक-यांना या योजनेत भाग घेणे अथवा न घेणे बाबत संबंधित बॅकेकडे विहित नमुन्यात घोषणापत्र व अर्ज सदर करावा लागेल अर्ज केला नसल्यास आपली संमती आहे असे गृहीत धरुन बॅकेमार्फत आपला विमा हप्ता कपात करण्यात येईल.
बिगर कर्जदार शेतक-यांनी विहीत मुदतीत बँकेत किंवा आपले सरकार सेवा केंद्र येथे ऑनलाईन फळपिक विमा पोर्टल www.pmfby.gov.in वर सहभाग नोंदवावा. (त्यासाठी अर्जदाराने आपल्या अर्जासोबत आधारकार्ड/आधार नोंदणी प्रत,
जमिन धारक
7/12, 8(अ) उतारा व फळबागेचा (Geo Tagging) केलेला फोटो , भाडेपट्टा करार असलेल्या शेतक-यांच्या करारनामा/सहमती पत्र,आणि बॅक पासबुकाची प्रत सादर करुन प्रत्यक्ष ईलेक्ट्रानिक साक्षांकन करणे बंधनकारक आहे.)
अधिक माहितीसाठी संबंधित तालूका कृषि अधिकारी किंवा विमा कंपनीकडे संपर्क साधून योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय् गावसाने यांनी केले.
****
Comments
Post a Comment