जिल्हा कारागृह, लातूर येथे कायदेविषयक जनजागृती आरोग्य शिबीर संपन्न
जिल्हा कारागृह,
लातूर येथे कायदेविषयक
जनजागृती आरोग्य शिबीर संपन्न
लातूर दि.14(जिमाका):-सर्वोच्च न्यायालय व महाराष्ट्र राज्य विधी सेवा
प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार दि. 2 ऑक्टोबर 2021 ते 14 नोव्हेंबर 2021 या
कलावधीमध्ये आजादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमाअंतर्गत लातूर जिल्हयामध्ये गावोगावी
कायदेविषयक जनजागृती शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त लातूर जिल्हा कारागृह,
लातूर येथे कायदेविषयक जनजागृती व आरोग्यविषयक शिबीर संपन्न झाले.
लातूर जिल्हा
कारागृह, लातूर येथे कायदेविषयक जनजागृती शिबीर व बंद्यासाठी आरोग्य शिबीराचे आयोजन
करण्यात आले. या कार्यक्रमात बलभीम माळी, तुरुग अधिकारी, डॉ. सुधीर बनशेळकीकर, पॅनल
ॲड.रमेश कुचमे, ॲड. अजय कलशेट्टी व लातूर जिल्हा कारागृहातील बंदी उपस्थित होते.
या शिबीरात डॉ.
सुधीर बनशेळकीकर यांनी बंद्याचे रक्त व लघवी, बिपी, शुगर इ. ची तपासणी केली, याच बरोबर
बंद्याची प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी तसेच रक्तवाढीसाठी बंद्याना 3 महिन्याकरिता गोळयांचे
वाटपही करण्यात आले.
या कार्यक्रमात
अजय कलशेट्टी यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणा मार्फत बंद्याना पुरविण्यात येत असलेल्या
कायदेविषयक सेवांविषयी मार्गदर्शन केले. ॲड. रमेश कुचमे यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कायदा व बंद्यांना
कायदेविषयक मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ॲड. अजय कलशेट्टी यांनी केले.
कायदेविषयक जनजागृती
व आरोग्य शिबीर या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विधी सेवा प्राधिकरण लातूर येथील न्यायिक
कर्मचारी, पॅनल विधीज्ञ व तुरुंगाधिकारी यांनी परिश्रम घेतले.
****
Comments
Post a Comment