प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील धार्मिक स्थळे / प्रार्थना स्थळे खुली करण्यासाठी मार्गदर्शक सुचना जारी

 

प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील धार्मिक स्थळे / प्रार्थना स्थळे खुली

करण्यासाठी मार्गदर्शक सुचना जारी

 

       लातूर,दि.4 (जिमाका):-जिल्हयात कोव्हिड-19 निर्बंधांबाबत  राज्यशासनाकडून सुधारित मार्गदर्शक सुचना प्राप्त झाल्या असून याव्दारे प्रतिंबंधित क्षेत्राबाहेरील धार्मिक स्थळे आणि प्रार्थना स्थळे खुली करणेबाबत मानक कार्यप्रणाली / मार्गदर्शक सुचना प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष पृथ्वीराज बी.पी. यांनी प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करुन लातूर जिल्हयातील प्रतिबंधीत क्षेत्रा बाहेरील धार्मिक स्थळे आणि प्रार्थना स्थळे दिनांक 7 ऑक्टोबर 2021 पासून खुली करणेसाठी मानक कार्यप्रणाली / मार्गदशक तत्वांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या अटीस अधीन राहून परवानगी  देत असल्याचे आदेश जारी केले आहेत.

         या प्रतिबंधीत क्षेत्राबाहेरील धार्मिक आणि प्रार्थना स्थळांच्या वेळेबाबत संबंधीत विश्वस्त / मंडळ / अधिकारी यांनी निर्ण घ्यावयाचा आहे. मास्क परिधान करणे, शारिरिक आंतराचे पालन करणे, थर्मल स्क्रिनिंग करणे आणि वारंवार हात धुणे किंवा सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक राहील. सर्व संबंधित प्रतिबंधीत क्षेत्रा बाहेरील धार्मिक स्थळे आणि प्रार्थना स्थळे यांचेकडून मानक कार्यप्रणाली / मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन केले जात असलेबाबत तपासणी करणेचे अधिकार त्या त्या क्षेत्रातील पोलीस अधिकारी / कर्मचारी व स्थानिक स्वराज्य संस्थांना देणेत येत आहेत.

           यापुर्वी कोविड-19 व्यवस्थापनासाठी या कार्यालयाकडून विहित केलेले दिनांक 13 ऑगस्ट 2021 रोजीचे आदेश आणि त्यात उल्लेख असलेल्या बाबी या सर्व निर्बंधासह पुढील आदेश होईपर्यंत जशास-तसे लागू राहतील.

      या आदेशाचे किंवा आदेशातील अटींचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधिताविरुध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 , साथरोग प्रतिबंधक कायदा, 1897 अन्वये दिलेल्या तरतुदीनुसार भारतीय दंड संहिता, 1860 चे कलम 188 नुसार तसेच महाराष्ट्र कोव्हीड-19 उपाययोजना नियम 2020 ई. तरतुदीनुसार कार्यवाही करण्यात यईल याची नोंद घ्यावी.

         धार्मिक स्थळे / प्रार्थना स्थळे या ठिकाणी होणारा कोव्हीड-19 विषाणू संसर्ग रोखण्यासाठीच्या मानक कार्यप्रणाली / मार्गदर्शक सूचना पूढील प्रमाणे आहेत.

      पार्श्वभूमि-धार्मिक स्थळे / प्रार्थना स्थळांच्या ठिकाणी मोठया संख्येने लोक एकत्र येत असतात अशा ठिकाणे / ठिकाणांच्या आवारात कोव्हीड- 19 विषाणू संसर्ग रोखण्यासाठी योग्य सामाजिक अंतर / इतर प्रतिबंधात्मक उपाययोजना यांचे काटेकोरपणे पालन करणे महत्वाचे आहे.

      व्याप्ती - या आदेशामध्ये कोव्हिड -19 विषाणू संसर्ग रोखण्यासाठी करावयाच्या सामान्य प्रतिबंधात्मक उपायासोबतच या विशिष्ट ठिकाणी करावयाच्या विशिष्ठ उपाययोजनांचा ही समावेश करण्यात आलेला आहे. कन्टेनमेंट झोनच्या आतील धार्मिक स्थळे / प्रार्थना स्थळे ही नागरीकांसाठी बंद राहतील.फक्त कन्टेनमेंट झोनच्या बाहेरील धार्मिक स्थळे / प्रार्थना स्थळे सुरु करणेस परवानगी असेल.

      सामान्य प्रतिबंधात्मक उपाययोजना – 65 वर्षावरील जेष्ठ नागरीक, इतर आजाराने ग्रस्त व्यक्ती, गरोदर महिला आणि 10  वर्षाखालील लहान मुले यांनी घरीच राहणेबाबत सल्ला देणेत येत आहे. धार्मिक / प्रार्थना स्थळांचे व्यवस्थापन करणाऱ्या संस्था यांनी याबाबत नागरिकांना सूचना दयाव्यात. कोव्हिड-19  विषाणू संसर्गाचा सामान्य प्रतिबंधात्मक उपाययोजना बरोबरच साध्या सार्वजनिक आरोग्य उपायांचेही पालन करणे आवश्यक आहे. या सर्व उपायांचे पालन सर्व धार्मिक स्थळे / प्रार्थना स्थळे या ठिकाणी सर्व कामगार / सेवेकरी / अभ्यांगत / भाविक यांचेकडून पूर्ण वेळ पालन करणे बंधकनकारक आहे.यामध्ये पूढील प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा समावेश असेल.

         या सार्वजनिक ठिकाणी शक्यतोवर वैयक्तिक कमीत कमी 6 फूट शारिरीक अंतर राखणे आवश्यक असेल. चेहरापट्टी / मास्क यांचा वापर करणे बंधनकारक असेल, हात साबणाने वारंवार हात धुणे (किमान – 40 ते 60 संकंदापर्यंत) बंधनकारक असेल. त्याचबरोबर सर्व ठिकाणी अल्कोहोल युक्त हॅण्ड सॅनिटायझरचा वापर (किमान 20 सेकंदापर्यंत ) करावा.

          श्वसन संबंधित शिष्टाचाराचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक असेल. यामध्ये शिंकताना किंवा खोकताना टिश्यू पेपर किंवा हातरुमाल किंवा हाताच्या कोपराने नाक व तोंड पूर्णपणे झाकले जाईल याची दक्षता घेणे तसेच वापरलेला टिश्यू पेपरची योग्य त्या पध्दतीने विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. या ठिकाणी येणाऱ्या सर्व नागरिक / कामगार / सेवेकरी यांनी स्वत:च्या आरोग्याचे निरिक्षण करणे तसेच आजारी असलेस स्थानिक प्रशासन / जिल्हा प्रशासनास कळविणे आवश्यक आहे. सार्वजनिक ठिकाणी थुकण्यास पूर्णपणे प्रतिबंध असेल, तसेच याचे उल्लंघन केलेस स्थानिक प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई केली जाईल. धार्मिक स्थळे / प्रार्थना स्थळे या ठिकाणी येणाऱ्या सर्वांनी आरोग्य सेतू ॲपचा वापर करावा.

        सर्व धार्मिक स्थळे / प्रार्थना स्थळे या ठिकाणी पूढील प्रमाणे उपाययोजना करतील. सर्व धार्मिक स्थळे / प्रार्थना स्थळांच्या ठिकाणी प्रवेशव्दारावर हात स्वच्छतेसाठी सॅनिटायझर डिस्पेंसर तसेच थर्मल स्क्रिनिंगची सोय करणे बंधनकारक असेल. धार्मिक / प्रार्थना स्थळांच्या ठिकाणी फक्त लक्षणे नसलेल्या व्यक्तींनाच प्रवेश असेल. सर्व व्यक्तींना चेहरा पट्टी / मास्कचा वार केला असेल तरच या ठिकाणी प्रवेश करण्याची परवानगी द्यावी. (No Mask – No Entry) धार्मिक / प्रार्थना स्थळांच्या ठिकाण्ीा कोव्हिड-19 विषाणू संसर्ग रोखण्यासाठीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना पोस्टर्स च्या माध्यमातून दर्शनी भागात लावण्यात याव्यात. तसेच या ठिकाणी कोव्हिड -19  विषाणू संसर्ग रोखण्याबाबतच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना ऑडीओ व व्हिडीओ च्या माध्यमातून जनजागृतीसाठी वारंवार ऐकवल्या / प्रसारित केल्या जात.

      धार्मिक / प्रार्थना स्थळांच्या ठिकाणी प्रवेश देणबाबत अभ्यागत / भाविकांबाबत निश्चित धोरण ठरवावे. त्या ठिकाणी निश्चित केलेल्या वेळेमध्ये किती लोकांना प्रवेश दिला जावा, याबाबतचा निर्णय धार्मिक / प्रार्थना स्थळांचा आकार, हवा खेळती राहीलअशी व्यवस्था ईत्यादी बाबी विचारात घेवून त्या स्थळांचे नियमन करणारे विश्वस्त / मंडळ / अधिकारी यांनी स्थानिक प्रशासनाशी चर्चा करुन करावे. चप्पल / बूट / पादत्राणे स्वत:च्या गाडीतच ठेवणेबाबत भाविकांना प्रवृत्त करावे. गरज असेल तर भाविकांनी वैयक्तिक / कुटूंबांची पादत्राणे एकत्र नेमून दिलेल्या ठिकाणी ठेवावीत. वाहन पार्किंगच्या ठिकाणी  तसेच परिसराबाहेर सामाजिक अंतराच्या निकषाचे पालन करुन गर्दीचे योग्य व्यवस्थापन करण्यात यावे.

         धार्मिक / प्रार्थना स्थळांच्या परिसरातील तसेच आवारा बाहेरील सर्व दुकाने / स्टॉल / कॅफेटेरिया या ठिकाणी पूर्णवेळ सामाजिक अंतराचे पालन करणे बंधनकारक असेल. धार्मिक / प्रार्थना स्थळांच्या परिसरामध्ये भाविकांच्या रांगांचे योग्य व्यवस्थापन करणे आणि योग्य सामाजिक अंतराचे पालन करणेसाठी योग्य मार्किंग करावे. भाविक / अभ्यागतांसाठी धार्मिक / प्रार्थना स्थळांच्या परिसरामध्ये स्वतंत्र प्रवेश व बाहेर जाणाऱ्या मार्गाची व्यवस्था करणे. धार्मिक / प्रार्थना स्थळांच्या परिसरातील भाविकांच्या / अभ्यागतांच्या प्रवेशासाठीच्या रांगामध्ये किमान 6 फूटांचे शारिरिक अंतर राखले जाईल याची दक्षता घेणे. यासाठी धार्मिक / प्रार्थना स्थळांचे व्यवस्थापन करणारी संस्था जबाबदार असेल.

          धार्मिक / प्रार्थना स्थळांच्या ठिकाणी  येणाऱ्या सर्व नागरिकांनी प्रवेश करण्या अगोदर हात व पाय साबण व पाण्याने धुवावेत. धार्मिक / प्रार्थना स्थळांच्या ठिकाणी अभ्यागत / भाविकांना बसण्याची व्यवस्था करत असतांना योग्य सामाजिक अंतर  राखावे. वातानुकूलित यंत्र / वायुविजनसाठी CPWD च्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करणेत यावे. वातानुकूलित यंत्रणांचे तापमान 24 डिग्री से. ते 30 डिग्री से. पर्यंत राखले जाईल तसेच सापेक्ष आर्दता 4.-70 टक्के पर्यंत असेल. शक्यतोवर पुरेसी ताजी हवा, क्रॉस व्हॅन्टीलेशन याची पुरेशी व्यवस्था करावी. पुतळे / मुर्ती / पवित्र पुस्तके यांना स्पर्श करण्यासा परवानगी असणार नाही. धार्मिक / प्रार्थना स्थळांच्या ठिकाणी मोठया प्रमाणात गर्दी करणेस परवानगी असणार नाही. संसर्गाचा विचार करता शक्य त्या ठिकाणी रेकॉर्ड केलेले भक्ति संगीत / गाणी वाजविली जावीत. परंतू कोणत्याही परिस्थितीत गाण्यासाठी एकत्र येणाऱ्या व्यक्तींना परवानगी देणेत येवू नये.

        एकमेकांना अभिवादन करताना शारिरिक संपर्क टाळण्यात यावा. धार्मिक प्रार्थनेसाठी एकत्रित येवून एकच चटई / जमखाना वापर करणेस परवानगी नाही. भाविकांनी त्यांची स्वतंत्र चटई किंवा जमखाना आणावा जो कि प्रार्थनेनंतर ते परत घेवून जातील. धार्मिक / प्रार्थना स्थळांच्या आतमध्ये प्रसाद वितरण किंवा पवित्र पाणी शिंपडणे इत्यादी सारख्या शारिरीक अर्पणांना परवानगी असणार नाही. धार्मिक / प्रार्थना स्थळांच्या ठिकाणी प्रभावी स्वच्छता व र्निर्जुंतुकीकरण  करावे. विशेषत: शौचालय, हात –पाय धुण्याचे ठिकाण इत्यादी ठिकाणी प्रभावी स्वच्छतेबाबत विशेष लक्ष दिले जावे. धार्मिक / प्रार्थना स्थळांच्या व्यवस्थापकाव्दारे या परिसरामध्ये वारंवार साफसफाई व निर्जतूकीकरण केले जावे.

     धार्मिक / प्रार्थना स्थळांच्या परिसरातील इमारतीतील जमिन, फरशी व इतर आवारात वारंवार स्वच्छता केली जावी. अभ्यागत / भाविक / सेवेकरी / कर्मचारी यांनी वापरलेले मास्क, चेहरापट्टी, हातमोजे यांची योग्य विल्हेवाट लावली जात आहे याची दक्षता घेणेत यावी. धार्मिक / प्रार्थना स्थळांच्या ठिकाणीकाम करणारे कर्मचारी / सेवकेकरी यांना कोव्हिड -19 सुरक्षा राजशिष्ठाचार (प्रोटोकॉल) गरजेचा आहे.त्याचबरोबर कामावर येण्या अगोदर तसेच आठवडयातून एकदा कोविड -19  चाचणी करणे आवश्यक असेल. खाण्याच्या तसेच शौचालयाच्या ठिकाणी  गर्दी  नियंत्रण करणे आवश्यक असेल. प्रत्येक धार्मिक / प्रार्थना स्थळांच्या ठिकाणी योणाऱ्या व्यक्तींची संख्या, जागा आणि सामाजिक अंतराचा प्रोटोकॉल पाळला जाईल याबाबत संबंधीत पोलिस अधिक्षक / जिल्हाधिकारी यांना हमीपत्र देणे बंधनकारक असेल.

    आवारात बाधित किंवा संशयित रुग्ण्‍ आढळल्या त्याबाबत पूढील प्रमाणे कार्यवाही करावी. आजरी व्यक्तीला इतरापासून दुर असे स्वतंत्र खोलीत किंवा जागेत ठेवावे. डॉक्टरांनी तपासणी करेपर्यंत त्या व्यक्तीने मास्क / चेहरापट्टी वापर करणे बंधनकाकर असेल.तात्काळ जवळच्या वैद्यकीय सुविधा (हॉस्पिटल / क्लिनिक ) केंद्रात कळवावे. तसेच स्थानिक / जिल्हा प्रशासनास कळवावे. नियुक्त केलेल्या सार्वजनिक आरोग्य प्राधिकरणाव्दारे (जिल्हा RRT , उपचार करणारे तज्ञ) सदर रुग्णांबाबत जोखीम मुल्यांकन केले जाईल. त्यानुसार रुग्ण्‍ , त्यांचे संपर्क  आणि निर्जुंतीकीकरण याबाबत पुढील कार्यवाही केली जाईल. सदर रुग्ण्‍ कोविड-19 विषाणू बाधित (पॉझिटिव्ह) आल्यास सर्व परिसर निर्जतुकीरण करण्यात यावा असेही आदेशात नमुद केले आहे.

 

                                                        *****

   

        

 

 

 

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा