मौजे भातखेडा व कोळपा येथे जलसुरक्षा आराखडा बैठक संपन्न
*मौजे भातखेडा व कोळपा येथे जलसुरक्षा
आराखडा बैठक संपन्न*
लातूर
दि.13(जिमाका):- अटल भूजल योजने अंतर्गत समाविष्ठ गावात आयुक्त सी.डी.
जोशी, राज्य समन्वयक डॉ. भाग्यश्री मग्गीरवार आयुक्तालय, भूसविय पुणे यांचे सुचनेनुसार
नुकतीच भातखेडा व कोळपा ता.जि.लातूर या गावांमध्ये अटल भुजल योजने अंतर्गत ग्रामपंचायत
व ग्रामस्थ्, ग्राम पाणी पुरवठा व स्वच्छता समिती, महिला बचत गट, अंगणवाडी सेविका यांची
जलसुरक्षा आराखडा पुर्व तयारी बैठक आणि गट चर्चा करुन जल सुरक्षा आराखडया बाबत बैठक
घेण्यात आली.
या वेळी सर्व गांवाच्या जल सुरक्षा आराखडयाची
आवश्यक ती माहितीचे संकलन करण्यात आले.गावस्तरीय संपुर्ण माहिती, जल अंदाजपत्रक व महाराष्ट्र
भूजल (विकास व व्यवस्थापन ) अधिनियम 2009 चा
व जल सुरक्षा आराखडया बाबत सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच लोकसहभाग, त्रयस्थ लेखा परिक्षणच्या दरम्यान कोणते
प्रश्न विचारु शकतात या बाबत माहिती देण्यात आली.
या बैठकीसाठी गावचे सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायतचे
सदस्य, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, महिला बचत गट प्रतिनिधी व ग्रामस्थ
उपस्थित होते. अटल भूजल योजना राबविणेसाठी लोकसहभागासाठी त्यांनी उत्सफुर्त प्रतिसाद
दिला. वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणाचे एस.बी. गायकवाड यांच्या
मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी शिवाजी केंद्रे व संतोष कांबळे
यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा प्रकल्प व्यवस्थापन
कक्ष व प्रकल्प कार्यान्वयीन यंत्रणा यांनी परिश्रम घेतले. यावेळी ग्रामस्थ मोठया संख्येने
उपस्थित होते. व त्यांचा ही योजना राबविणेसाठी संयुक्त सहभाग नोंदविणार असल्याची ग्रामपंचायतीचे
प्रतिनिधी व ग्रामस्थ यांनी ग्वाही दिली.
***
Comments
Post a Comment