प्राधिकृत अधिकारी (प्रशासक) यांचे पॅनेल तयार करण्यासाठी विहित नमुन्यात अर्ज करावेत

 

प्राधिकृत अधिकारी (प्रशासक) यांचे पॅनेल तयार

करण्यासाठी विहित नमुन्यात अर्ज करावेत

 

  लातूर,दि.1(जिमाका) विभागीय सहनिबंधक,सहकारी संस्था,लातूर यांच्याकडून महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 77 अ, 78 अ अन्वये सहकारी गृहनिर्माण संस्थांवर नेमण्यात येणाऱ्या प्राधिकृत अधिकारी (प्रशासक) यांचे पॅनेल तयार करण्यासाठी अर्ज राज्य शासनाचे अ व ब प्रवर्गातील सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी अथवा मान्यताप्राप्त विद्यापिठाची पदवी आणि शासकीय सहकार व लेखा पदविका (जी.डी.सी.ॲण्ड ए ) उच्चतम सहकार पदविका (एच.डी.सी.) धारक, अथवा चार्टर्ड अकाऊटंट (सी.ए.) इन्सिटटयूट ऑफ कॉस्ट ॲण्ड वर्कस अकाऊटंट (आय.सी.डब्ल्यू.ए ) कंपनी सेक्रेटरी (सी.एस.), अथवा सहकार खात्यातील प्रशासन / लेखापरिक्षण विभागातील सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी, अथवा नागरी कर्मचारी सहकारी बँकेमध्ये व्यवस्थापक पदावर किमान पाच वर्षे काम केलेली व्यक्ती अथवा कायद्याचे पदवी धारक / संगणकीय ज्ञान आवश्यक उदा. एम.एस.सी.आय.टी. वा अन्य समकक्ष वा उच्चत्तम पात्रताधाकर यांचेकडून  अर्ज मागविण्यात येत आहे.

अर्जाचे विहीत नमुने विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था,लातूर विभाग लातूर, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, लातूर / उस्मानाबाद / बीड/ नांदेड व लातूर विभागातील सर्व तालुका उपनिबंधक / सहाय्यक निबंधक सहकारी संस्था या कार्यालयात दिनांक 4 ऑक्टोबर 2021 ते 1 नोव्हेंबर 2021 या कालावधीत कार्यालयीन वेळेत मिळू शकतील. याबाबतची सूचना उपरोक्त नमूद कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था, लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

 

                                          ****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु