*नागरिकांनी कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी लसीकरण करुन घ्यावे* - *जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी.*

 

*नागरिकांनी कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी लसीकरण करुन घ्यावे*

                                  - *जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी.*

 

§  *मिशन कवच कुंडल मोहिमेतंर्गत जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयात लसीकरण

§  *जिल्ह्यात पहिला डोस - 42 हजार 784 तर दुसरा डोस - 27 हजार 132 असे एकूण 69 हजार 916 नागरिकांचे लसीकरण*

§  *शेताच्या बांधावर जावून लसीकरण *

 

 

   लातूर दि.13,(जिमाका):- मिशन कवच कुंडल मोहिमेतंर्गत जिल्ह्यातील केंद्रावर जावून लसीकरण करुन घ्यावे, असे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी आवाहन केले आहे.

          राज्यात लसीकरण मोठ्या प्रमाणात होण्यासाठी शासनाच्या सूचनेनुसार लातुर जिल्ह्यामध्ये मिशन कवच कुंडल ही मोहीम राबविली  जात आहे. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी सर्व विभागप्रमुख आयएमए, व्हीएसटीएस यांची बैठक घेऊन सर्व विभागांना सक्रिय सहभाग घ्यावा, असेही आवाहन केले आहे.

जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालयात पहिला डोस – 5 हजार 668, दुसरा डोस- 4 हजार 43 असे एकूण 9 हजार 656 तर लातूर महानगर पालिकातंर्गत पहिला डोस -6 हजार 270 , दुसरा डोस- 4 हजार 486 असे एकूण 10 हजार 756 इतके लसीकरण झाले आहे.

        ही मोहिम दि. 8 ते 14 ऑक्टोबर 2021 या कालावधीत मिशन कुंडल कवच मोहिम जिल्हयात राबविण्यात येत आहे. या कालावधीतील म्हणजेच दि.8 ते 12 ऑक्टोबर दरम्यान आरोग्य विभागामार्फत जिल्हयामध्ये पहिला व दुसऱा डोस  नागरीकांना एकूण 69 हजार 916 नागरीकांना देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण रुग्णालय येथे लसीकरणाची तालुकानिहाय माहिती पुढीलप्रमाणे आहे:-

ग्रामीण रुग्णालय उदगीर येथे पहिला डोस 2 हजार 592 दुसरा डोस 1 हजार 590 एकूण 4 हजार 182, रुग्णालय अहमदपूर येथे पहिला डोस  625 दुसरा डोस 297 एकूण 921, , ग्रामीण रुग्णालय औसा येथे पहिला डोस 416 दुसरा डोस 362 एकूण 886, ग्रामीण रुग्णालय रेणापूर येथे पहिला डोस 342 दुसरा डोस 259 एकूण 650, उपजिल्हा रुग्णालय निलंगा येथे पहिला डोस - 347 , दुसरा डोस - 334 असे एकूण 598, ग्रामीण रुग्णालय मुरुड येथे पहिला डोस - 249 , दुसरा डोस - 286 असे एकूण 478, ग्रामीण रुग्णालय बाभळगांव येथे पहिला डोस - 183, दुसरा डोस - 121 असे एकूण 430, ग्रामीण रुग्णालय चाकूर येथे पहिला डोस - 291, दुसरा डोस - 164 असे एकूण 417, ग्रामीण रुग्णालय किल्लारी येथे पहिला डोस - 180 , दुसरा डोस-143 असे एकूण 415, ग्रामीण रुग्णालय जळकोट येथे पहिला डोस - 169 , दुसरा डोस - 127 असे एकूण 262, ग्रामीण रुग्णालय देवणी येथे पहिला डोस - 151 , दुसरा डोस-245 असे एकूण 256, ग्रामीण रुग्णालय कासारशिरशी  येथे पहिला डोस - 123 , दुसरा डोस - 115 असे एकूण 161, इतके लसीकरण झाले आहे.






 

 

 

 

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा