*आजादी का अमृत महोत्सवा निमित्त मौजे बाभळगाव येथे* *कायदेविषयक शिबीर संपन्न
*आजादी का अमृत महोत्सवा निमित्त मौजे बाभळगाव येथे*
*कायदेविषयक शिबीर संपन्न*
दि.05
ऑक्टोबर 2021 रोजी मौजे बाभळगाव, ता. जि.लातूर येथे सकाळी 9.00 वाजता सार्वजनिक उपयोगिता
सेवांवर जागरुकता शिबीर, केंद्र / राज्य सरकारच्या योजनेविषयी जनजागृती, नालसा योजनांबाबत
जागरुकता, महिलांचे हक्क, एडीआर यंत्रणाविषयी जागरुकता, शिक्षणाचे हक्क व अधिकार, विधी
सेवा प्राधिकरणाचे महत्व, नालसा महिला पिडीत / लैंगिक अपराधांपासून वाचलेल्यांसाठी
भरपाई योजना इत्यादी कायदेविशयक विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमास न्या. श्रीमती एस. डी.
अवसेकर, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, लातूर, न्या. श्रीमती ए. ए. पिरजादे पाटील,
अति. सह दिवाणी न्यायाधिश क.स्तर, लातूर, न्या. श्रीमती के. बी. गाडीवाले, अति. सह
दिवाणी न्यायाधिष क.स्तर, लातूर, न्या. श्रीमती जी.जी. औटी, अति. सह दिवाणी न्यायाधिश
क.स्तर, लातूर तहसिलदार श्री. स्वप्नील पवार,
गट विकास अधिकारी श्री. गोडभरले, अॅड. अजय कलशेट्टी, अॅड. रमेश कुचमे, अॅड.
छाया मलवाडे, अॅड. मस्के, बाभळगाव ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य
व तसेच मौजे बाभळगाव, सोनवती, सारोळा, सेलु ता.जि.लातूर येथील तलाठी व ग्रामसेवक आणि
गावातील नागरिक, महिला यांची उपस्थिती होते.
तसेच
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड. श्रीमती छाया मलवाडे यांनी केले. न्या. श्रीमती एस.
डी. अवसेकर, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, लातूर यांनी अध्यक्षीय भाषण, नालसा
योजनांबाबत तसेच लोकन्यायालय याविषयी मार्गदर्शन
केले. तहसिलदार स्वप्नील पवार यांनी शेतकऱ्यांचे
अधिकार व महसुल संदर्भात मार्गदर्शन केले. गट विकास अधिकारी श्री. गोडभरले यांनी महसुल अधिकार
व डिजीटल सातबारा संदर्भात व ग्रामीण भागासाठी विविध योजना संदर्भात माहीती दिली.
न्या.
श्रीमती ए. ए. पिरजादे पाटील यांनी महिलांविषयी शिक्षणाचे अधिकार व महिलांकरीता असलेले
सर्व कायदे व योजना या संदर्भात संक्षिप्त माहिती दिली. तसेच न्या. श्रीमती के. बी.
गाडीवाले यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अंतर्गत असलेले कायदे व शिक्षणाचा अधिकार
विषयी मार्गदर्शन केले. न्या. श्रीमती जी. जी. औटी यांनी बालकाच्या पालकांची कर्तव्ये
याविषयी माहिती दिली. बालकांना शिक्षण देणे किती महत्वाचे आहे, याची कायदेविषयक माहिती
देण्यात आली. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, लातूर येथील न्यायिक कर्मचारी, पॅनल विधीज्ञ, ग्रामपंचायत
मधील कर्मचारी व बाभळगाव येथील ग्रामस्थ यांनी विषेश परिश्रम घेतले व कार्यक्रम संपन्न
झाला.
Comments
Post a Comment