*मताधिकार जागृतीसाठी* *“लोकशाही भोंडला” स्पर्धाचे आयोजन*

 

*मताधिकार जागृतीसाठी*

*“लोकशाही भोंडला स्पर्धाचे आयोजन*

 

            लातूर,दि.6 (जिमाका):- लोकगीतांचा पारंपरिक गोडवा आणि समाजाला आवाहन करण्याची ताकद लक्षात घेऊन यावर्षी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने लोकशाही भोंडला ही स्पर्धा दिनांक 7 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर पर्यंत आयोजित केली असल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

 नवरात्री महोत्सव हा निसर्गाच्या सर्जनशीलतेचा आणि निर्मितीशील स्त्रीशक्तीचा उत्सव ! महाराष्ट्रातील या उत्सवाचं एक वैशिष्टये म्हणजे भोंडला गीते. आपल्या लोकसंस्कृतीचं अनन्य वैशिष्टय असणारा हा भोंडला कुठे हादगा, तर कुठे भुलाबाई म्हणून साजरा केला जातो. वेगवेगळया नावने ओळखला जाणारा भोंडला जणू स्त्रियांना त्यांची सुखदु:खं व्यक्त  करण्याचं हे पारंपरिक व्यासपीठच ! सासर-माहेर, तिथली प्रेमा- व्देषाची नाती हे सगळं स्त्रिया या लोकगीतांतून वर्षानुवर्ष सांगत आल्या आहेत.

देशाच्या लोकशाहीत निम्मी संख्या स्त्रियांची आहे. आणि स्त्री ही संपूर्ण कुटुंबाचा आधारस्तंभ, प्रेरणास्त्रोत असते. कुटुंबातील स्त्रीपर्यंत एखादी गोष्ट पोहोचली तर ती फक्त तिच्यापुरती मर्यादित राहत नाही, ती संपूर्ण कुटुंबाला त्याच्यात सहभागी करुन घेत असते. स्त्रीची हीच ताकद लक्षात घेऊन लोकशाही भोंडला’ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेतून स्त्रिया स्वत: तर आपल्या मताधिकाराचा , लोकशाही मूल्यांचा विचार करतीलच, पण सोबत त्यांची कुटुंबंही याबाबत सजग होतील.

भोंडल्यांच्या गीतामध्ये माहेर हे सुखाचं तर सासर कष्टाचं असतं. माहेरची नाती ओढ लावणारी सर सासरची नाती द्वेषाची असतात माहेरात मनाजोगं स्वातंत्र्य स्वच्छंद पणा असतो तर सासरी बंधने कष्ट असतात एकूणच या गीता मधलं माहेर गोड असतं जिथे खायला सापडतं तर सासर द्वाड असतं जे कोंडून मारतय या लोकशाही भोंडला स्पर्धेसाठी सासर माहेर च्या जागी लोकशाही हुकूमशाही यांची प्रतीकात्मक रचना करायला आणि त्यांचे विशेष सांगायला खूपच वाव आहे काही गीतामध्ये माहेरी जाऊ इच्छिणाऱ्या सुनेला सासू एक एक काम सांगत जाते आणि तिचे माहेरी जाण्याचे स्वप्न लांबणीवर पडते याच प्रकारे आधुनिक स्त्रीला कामाच्या डबडग्यात तिची मतदार म्हणून नाव नोंदणी किंवा लग्नानंतर झालेल्या नावात बदल करणे यासारख्या कामात चालढकल करावी लागते या गीतांच्या माध्यमातून तिला यासाठी प्रेरित करणाऱ्या गीत रचना करता येते.

लोकगीतांच्या अंगभूत लवचिक स्वरूपामुळे त्यामध्ये आधुनिक स्त्रीचं्त्रीचे मानस गुंफण ही सहज शक्य आहे. आणि हे मानस गुंफतांना तिच्या स्वतंत्र व्यक्तीमत्वा बरोबरीनेच तिने आपल्या मताधिकाराबाबत जागृत कसं व्हावं, हे सांगता येईल. लोकगीतातील स्त्रीपेक्षा आजची स्त्री स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाची आहे. निर्णयक्षम आहे, हे लक्षात घेऊन तिने आपला लोकप्रतिनिधीही स्वनिर्णयाने, लोकशाही मूल्यांना प्रमाण मानून गावाच्या-देशाच्या विकासाला प्राधान्य देणारा निवडावा, असं आव्हान करता येईल.

 मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी अधिकाधिक महिलांना या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. या स्पर्धेची सविस्तर नियमावली मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर पाहता येईल. स्पर्धेविषयी अधिक माहितीसाठी 8669058325 ( प्रणव सलगर) या व्हाट्सअप क्रमांकावर संदेश पाठवून संपर्क साधावा. असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी लातूर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

 स्पर्धेची नियमावली पुढील प्रमाणे आहे. सदर स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. एकल (Solo) किंवा समूह दोन्ही प्रकारची गीते पाठवता येतील. स्पर्धेचा अर्ज पुढीलप्रमाणे भरावा :- समूह गीते पाठवताना अर्ज एकाच स्पर्धकाच्या नावे भरावा. लोकशाही, निवडणूक, मताधिकार या विषयांशी संबंधित भोंडला गीत गाऊन त्याची ध्वनिचित्रफीत (व्हिडिओ) पाठवावी. गाण्यासोबत भोंडल्याचा नाच असेल तरी चालेल. एका स्पर्धकाने किंवा समूहाने एकच गीत पाठवावे. आपल्या गीतांची ध्वनिचित्रफीत पाठवताना, ती कमीत-कमी दोन मिनिटाची आणि जास्तीत- जास्त चार मिनिटाची पाठवावी. ध्वनीचित्रफितीची (व्हिडिओची) साईज जास्तीत जास्त 300 mb असावी. तसेच, ही ध्वनिचित्रफीत mp4 फॉरमॅटमध्ये असावी.

 स्पर्धेसाठी निश्चित केलेल्या विषयावर भोंडला गीत पाठवणाऱ्या स्पर्धकाचाच अर्ज ग्राह्य धरला जाईल. आपली ध्वनिचित्रित http://.forms.gle/G8TSJHyFN9hzatzH9  या गुगल अर्जावरील माहिती भरून त्यावर पाठवावेत. स्पर्धेविषयी अधिक माहितीसाठी 8669058325 ( प्रणव सलगर) या व्हाट्सअप क्रमांकावर संदेश (मेसेज) पाठवून संपर्क साधावा. दि. 7 ऑक्टोबर 2021 ते 15 ऑक्टोबर 2021 या काळात आलेले साहित्यच स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जाईल.

 बक्षिसांचे स्वरूप पुढील प्रमाणे असेल:- प्रथम क्रमांक 11हजार, द्वितीय क्रमांक 7 हजार तृतीय क्रमांक 5 हजार व उत्तेजनार्थ 1 हजार रुपयांची एकूण दहा बक्षिसे राहतील.

 लोकशाही,  निवडणूक, मताधिकार विषयाशी संबंधित साहित्य पाठवणाऱ्या सहभागी सर्व स्पर्धकांना (समूह गीतात सहभागी प्रत्येकाला) मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र यांच्यातर्फे प्रमाणपत्र देण्यात येईल. तसेच विजेत्यांना प्रमाणपत्र आणि मानचिन्ह देण्यात येईल.   भोंडाला गीतांतून सर्वोत्तम गीते निवडण्याचा अंतिम निर्णय परीक्षक आणि आयोजक यांच्याकडे राहील. स्पर्धकाने पाठवलेल्या साहित्यावर कोणी अन्य कुणी स्वामित्व हक्क सांगितल्यास त्याची पडताळणी करण्याची जबाबदारी सदर स्पर्धकाची असेल. स्पर्धेतील उत्कृष्ट साहित्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या समाज माध्यमावर प्रसारित केले जाईल

00000

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा