नामतालिका (पॅनल) तयार करण्यासाठी विहित नमुण्यात अर्ज करावेत

 

नामतालिका (पॅनल) तयार करण्यासाठी

विहित नमुण्यात अर्ज करावेत

 

  लातूर,दि.1(जिमाका) विभागीय सहनिबंधक,सहकारी संस्था,लातूर यांच्याकडून 250 पर्यंत किंवा त्यापेक्षा कमी सभासद संख्या असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुका घेणे साठी निवडणूक निर्णय अधिकारी यांची नामतालिका (पॅनल) तयार करण्यासाठी शासकीय विभागातील / स्थानिक स्वराज्य संस्थेतील / सहकारी संस्थेतील कायम कार्यरत अधिकारी / कर्मचारी (वरीष्ठ लिपीक किंवा त्यापेक्षा जादा दर्जा असलेल्या कर्मचारी ), प्रमाणित लेखापरीक्षक, वकील (पाच वर्षाचा कामाचा अनुभव) व शासकीय सेवेतून / स्थानिक स्वराज्य संस्थेतून सेवानिवृत्त झालेला अधिकारी / कर्मचारी (वयाची 65 वर्ष पेक्षा जास्त नसलेला) यांचेकडुन विहीत नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

सदरील अर्ज दिनांक 4 ऑक्टोबर ते 18 ऑक्टोबर 2021 या कालावधीमध्ये (शासकीय सुट्टीचे दिवस वगळून) संबंधीत जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांचे कार्यालयात कार्यालयीन वेळेत स्विकारण्यात येणार आहेत.

याबाबतचे सुचना / विहीत नमुन्यातील अर्ज / अटी / शर्ती जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, लातूर / बीड/ नांदेड व उस्मानाबाद यांचे कार्यालयाचे नोटीस बोर्डावर डकविण्यात आले असून इच्छुकांनी अर्ज करावेत असे विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था, लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

 

                                       ***

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु