पालकमंत्री अमित देशमुख यांचा लातूर जिल्हा दौरा
पालकमंत्री अमित देशमुख यांचा लातूर जिल्हा दौरा
लातूर
दि.14(जिमाका):-राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य
मंत्री तथा लातूर जिल्हयाचे पालकमंत्री
अमित विलासराव देशमुख हे लातूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा
दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
शुक्रवार, दिनांक 15 ऑक्टोबर 2021 रोजी
सकाळी 11.00
वाजता जगदंबा मंदीर, गंजगोलाई लातूर येथे महापुजेसाठी उपस्थिती. सकाळी 11.30 वाजता
गंजगोलाई लातूर येथील सुशोभिकरण कामाच्या लोकार्पण कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी
12.00 वाजता हनुमान चौक, लातूर
येथे “सुनबाई- महाराष्ट्राची” मराठवाडयातील पहिले
वुमेन्स एथनिक वेअर शोरुमच्या उद्घाटनास उपस्थिती.
दुपारी
12.45 वाजता तहसिल कार्यालयासमोर, मेन रोड,लातूर येथे “मॉडर्न इमेजिंग” या नवीन अद्यावत डायग्नोस्टिक सेंटरच्या उद्घाटनास उपस्थिती.
दुपारी 1.15
वाजता अशोक हॉटेल,मेन रोड,लातूर येथे थायराईड
क्लिनीकच्या उद्घाटनास उपस्थिती. सायं. 6.00 वाजता साळुंके पेट्रोलियम, औसा जि.लातूर
येथील पेट्रोल पंपाच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती.
******
Comments
Post a Comment