दिल्ली येथील विविध शाळांना राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिली भेट

 

दिल्ली येथील विविध शाळांना

राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिली भेट  


लातूर,दि.27 (जिमाका):-
राज्याचे पर्यावरण, पाणी पुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे हे नुकतेच दिल्ली दौऱ्यावर असताना त्यांनी शाळेंना भेटी दिल्या व दिल्ली  राज्य शासनाने शिक्षणाच्या बाबतीत केलेल्या कामाचे स्वरूप समजून घेतले. यावेळी त्यांच्या सोबत दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया व स्थानिक अधिकारी उपस्थित यांची उपस्थिती होती.


यावेळी बोलताना राज्यमंत्री संजय बनसोडे म्हणाले की, शिक्षणांची गंगा ही सामान्य माणसापर्यंत पोहचवली गेली पाहिजे. सुसंस्कृत समाज निर्मितीसाठी शिक्षण महत्त्वाचे आहे. आधुनिक काळानुसार शिक्षण दिले गेले पाहिजे. समाजाचा कोणताही घटक शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी समाजातील प्रत्येक व्यक्तीने कार्य करावे. यासंदर्भात दिल्ली राज्य शासनाने केलेले कार्य अंत्यत स्तुत्य असून यामुळे समाजातील प्रत्येक घटकांना आधुनिक दर्जाचे शिक्षण मिळेल.

दिल्ली राज्य शासनाच्या सरकारी शाळेचे रुप बदलेले आहे. व  त्याचा फायदा येथील सामान्य जनतेला होत आहे. समाजातील शिक्षणाची दरी कमी करून प्रत्येकाला योग्य शिक्षण देण्यात येत आहे. शिक्षणातील हा नवीन प्रयोग येणाऱ्या काळात देशाला दिशा देणारा ठरणार आहे.

स्कूल ऑफ स्पेशलाइज्ड एक्सलन्सची’ अंतर्गत सुरू केलेल्या आधुनिक सुविधांनी सुसज्ज अशा शाळेचं स्वरूप त्यांनी जाणून घेतले. तसेच यात शाळेत अभ्यासाबरोबरच क्रिडा उपक्रमही  घेतली जातात, सर्व वर्ग अध्यापनाशी संबंधित, सर्व आधुनिक सुविधांनी सुसज्ज आहेत. तसेच या  सरकारी शाळेत  वॉटर हार्वेस्टिंग प्लांटसारख्या पर्यावरणपूरक योजनांचाही शाळेच्या इमारतीत समावेश करण्यात आला आहे. अशा पद्धतीचा शाळा इमारत निर्मितीचा संकल्प आपल्या मतदारसंघात सुरू करण्याच्या अनुषंगाने यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी चर्चा केली  .

शिक्षण क्षेत्रात सुरू केलेल्या सरकारी शाळा विषयी विविध उपक्रमाबाबतही यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी संवाद साधला.


Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु