आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रमानिमित्त मौजे वासनगाव,टाकळी (ब),महापूर, चिंचोलीराव वाडी, नादगाव व जेवळी येथे भव्य कायदेविषयक शिबीर संपन्न

 

आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रमानिमित्त

मौजे वासनगाव,टाकळी (ब),महापूर, चिंचोलीराव वाडी,

नादगाव व जेवळी येथे भव्य कायदेविषयक शिबीर संपन्न

 

लातूर दि.25(जिमाका):- मा.सर्वोच्च न्यायालय व मा. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार दि. 2 ऑक्टोबर, ते 14 नोव्हेंबर, 2021 या कालावधीमध्ये आजादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमानिमित्त लातूर जिल्हयामध्ये गावोगावी कायदेविषयक जनजागृती शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

कायद्याचे ज्ञान जनसामान्यापर्यंत पोहचविण्यासाठी दयानंद विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मौजे वासनगाव, टाकळी, महापूर, चिंचोलीराव वाडी, नांदगाव व जेवळी येथे जावुन तेथील ग्रामस्थांना कायदेविषयक मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमास वासनगाव येथे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गावचे सरपंच पुष्पाताई थोरमोटे या होत्या. प्रमुख वक्ते जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे विधी स्वयंसेवक आशिष कुटवाडे यांनी विधी सेवा प्राधिकरण या विषयावर सविस्तर उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले. विधी स्वंयसेवक राहुल पंढरी चेबळे यांनी लोकअदालत या विषयावर मार्गदर्शन केले. आग्रवाल गायत्री खंडेलवाल वैष्णवी, रोहन टाकळकर यांनीही लोकअदालतीचे महत्व नागरिकांना पटवून दिले आहे. येथील कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन ग्रामस्थ गोविंद लोभे यांनी केले व आभार प्रदर्शन बळीराम कानवटे यांनी केले. कार्यक्रमास गावातील सरपंच,ग्रामसेवक व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

टाकळी (ब) येथे कार्यक्रकमाचे अध्यक्ष म्हणुन किनीकर एस.डी. हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे विधी स्वयंसेवक भालेराव मयुरी सुभाष हया होत्या. त्यांनी या कार्यक्रमा प्रसंगी उपस्थितांना महिलांचे अधिकार या विषयावरती सखोल असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अंभुरे सर यांनी केले. या कार्यक्रमास गावातील नागरिक, महिला, सरपंच,उपसरपंच,ग्रामसेवक आदी उपस्थित होते. कायदेविषयक शिबीर यशस्वी होण्यासाठी टाकळीचे ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच यांचे विशेष सहकार्य लाभले.

महापूर येथे या कार्यक्रमाला गावचे सरपंच बनसोडे शिवाजी येरप्पा, उपसरपंच कुलकर्णी प्रवीण उत्तमराव, ग्रामसेविका ढोबळे एस.जी. व ग्रामपंचायतीचे सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या विधी स्वयंसेविका प्रियांका देशपांडे या होत्या. यावेळी त्यांनी कौटुंबिक हिंसाचार कायदा- 2005 याबद्दल सांगत असताना हिंसेची व्याख्या या कायद्यामध्ये असणाऱ्या विविध तरतुदी विस्तृतपणे मांडल्या व महिलांना मार्गदर्शन केले. तसेच तोफिक तांबोळी यांनी वैकल्पिक वाद- विवाह पद्धती व मध्यस्थी तसेच इतर वाद सोडवण्याचे मार्ग याबद्दल ग्रामस्थां बरोबर चर्चा केली. तसेच सुनील गायकवाड, शुभम बिराजदार आणि निकिता चव्हाण यांनी ग्रामस्थांच्या कायदेविषयक समस्या जाणून घेऊन परीसंवाद साधला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामसेविका सौ. ढोबळे एस.जी. यांनी केले तर आभार प्रदर्शन सरपंच बनसोडे शिवाजी यांनी केले. यावेळी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 चिंचोलीराव वाडी येथील कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून गावचे सरपंच दत्ता सपताल हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून विधी स्वयंसेवक अक्षयकुमार शिवकुमार बनसोडे व ग्रामसेवक पी. आर. सय्यद होते. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण विधी स्वयंसेवक अक्षयकुमार बनसोडे यांनी कौटुंबिक हिंसाचार व महिलांचे अधिकार या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रमास उपस्थित महिलांना केले. कार्यक्रमास गावचे सरपंच, गायरान चे संचालक मधुकर केशवे व बाळू बोयने यांनी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमास ग्रामस्थ व महिला आवर्जून उपस्थित होत्या.

 नांदगाव येथे कार्यक्रमाचे अध्यक्ष गरजे काका, गावचे जेष्ठ नागरिक हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून  जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चे विधी स्वयंसेवक शुभम अरुण येलशेट्टे, आकाश एकनाथराव मदने, ललित गायकवाड, श्रीनिवास फुलसे व ग्रामसेवक देशपांडे हे होते. सर्व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे विधी स्वयंसेवक शुभम आरून येलशेट्टी यांनी लिंग समानता यावर सविस्तर असे विवेचन येथील ग्रामस्थांना केले. तसेच आकाश मदने यांनी विधी सेवा प्राधिकरण यावर विशेष मार्गदर्शन केले. यासोबतच श्रीनिवास फुलसे, विधी स्वयंसेवक यांनी ही कायदेविषयक मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास येथील ग्रामसेवक सरपंच व गावातील जेष्ठ नागरिक, महिला व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुमित्रा दयानंद बहिर, आशा कार्यकर्त्या यांनी केले. तर आभार प्रदर्शन विधि स्वयंसेवक ललित गायकवाड यांनी केले.

 जेवळी येथे कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून गावचे सरपंच रंजना वैद्य होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून विधी स्वयंसेवक मुल्ला समिन हरून, मोरे चैतन्य दयानंद व ग्रामसेवक श्रीमती कल्याणी सुनंदा प्रभू हे होते. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चे विधि स्वयंसेविका यांनी बेटी बचाव बेटी पढाव या विषयावर कार्यक्रमास उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा सखाराम शिंदे, ग्रामस्थ यांनी केले. कार्यक्रमास गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, गावकरी व महिला आवर्जून उपस्थित होते.

 तसेच हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, लातूर येथील न्यायिक कर्मचारी दयानंद विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी तसेच उपरोक्त गावातील ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच यांनी विशेष परिश्रम घेतले व कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न केला.

                                                       ***

 

 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु