अमृत महोत्सवी वर्षानिमित्त एचआयव्ही/ एड्स जनजागृती करीता आयोजित करण्यात आलेल्या प्रश्नमंजूषा स्पर्धा

 

अमृत महोत्सवी वर्षानिमित्त

 एचआयव्ही/ एड्स जनजागृती करीता

आयोजित करण्यात आलेल्या प्रश्नमंजूषा स्पर्धा

 

लातूर,दि.26 (जिमाका) या कार्यालयामार्फत भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त केंद्र शासनाच्या आझादी का अमृत महोत्सव INDIA@75 या कार्यक्रमा अंतर्गत जिल्हा एडृस प्रतिबंध व नियंत्रण पथक, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, लातूर मार्फत श्रीमती सुशिलादेवी देशमुख महाविद्यालय, लातूर येथे व संयुक्त विद्यमाने जिल्हयातील रेड रिबन क्लब (RRC) असलेल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी एचआयव्ही / एड्स, रक्तदान व क्षयरोग या विषयी जनजागृती करीता प्रश्नमंजूषा स्पर्धा दि. 25 ऑक्टोबर 2021 रोजी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एल.एस.दुशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती.

प्रश्नमंजूषा स्पर्धेत श्रीमती. सुशिलादेवी देशमुख महाविद्यालय, लातूर, राजर्षी शाहु महाविद्यालय, जयक्रांती महाविद्यालय, आझाद महाविद्यालय,औसा, महात्मा गांधी महाविद्यालय अहमदपूर,शहिद भगतसिंग महाविद्यालय, किल्लारी, दयानंद कला महाविद्यालय, लातूर महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, लातूर येथील विद्यार्थी (संघ) उपस्थित होते.

प्रश्नमंजूषा स्पर्धेत प्रथम संघ- महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, लातूर व्दितीय संघ-राजर्षी शाहु महाविद्यालय, लातूर तृतीय संघ- दयानंद कला महाविद्यालय, लातूर नी क्रमांक मिळवला असुन विजेत्या प्रथम क्रमांकास रु. 5 हजार, व्दितीय क्रमांकास रु. 2 हजार, तृतीय क्रमांकास रु. 1 हजार तसेच ट्रॉफी व प्रशस्तीपत्र देण्यात आले. तसेच सर्व सहभागी विद्यार्थी यांना प्रशस्तपत्र देण्यात आले.

या स्पर्धेचे उद्घाटन प्राचार्य श्रीमती. सुशिलादेवी देशमुख महाविद्यालय लातूर डॉ. अजय पाटील, यांनी केले केले.या प्रसंगी बिपीन बोर्डे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, लातूर, प्रा. डॉ.कुमार बनसोडे, प्रा.डॉ.मल्लीकार्जुन करजगी,प्रा.डॉ. सौ.सविता किर्ते, प्रा.डॉ.सौ. सुरेखा बनकर व प्रा. डॉ. विजय कुमार मेकेवाड तसेच आरोग्य विभागातील कर्मचारी उपस्थित होते.

 

                                                        


 

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा