महिला किसान दिनी उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांचा सत्कार
महिला किसान दिनी उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांचा
सत्कार
लातूर दि.21(जिमाका):-लातूर
जिल्हयातील महिला शेतकऱ्यांना कळविण्यात येते की, कृषि विज्ञान केंद्र, लातूर येथे
दि. 22 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 11.00 वाजता महिला किसान दिन साजरा करण्यात येणार असून
या कार्यक्रमामध्ये कृषि मुल्यवर्धन आणि विपणन साखळी व्यवस्थापन या विषयामध्ये उत्कृष्ट
काम करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात येणार आहे.
तसेच
कृषि मुल्यवर्धन आणि विपणन साखळी व्यवस्थापन या विषयावर कार्यशाळा होणार असून कृषि
विभागाच्या विविध योजनाबाबत सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. तरी या विषयाशी संबंधीत
महिला शेतकऱ्यांनी उपस्थित रहावे. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय
गावसाने एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.
****
Comments
Post a Comment