शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी 20 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ

 

       लातूर,दि.4 (जिमाका) जिल्हयातील सर्व शासन मान्यता प्राप्त अनुदानित / विनाअनुदानित / कायम विनाअनुदानित महाविद्यालयाचे प्राचार्य व या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थी यांनी सन 2019-20 साठी Re-apply  करण्यासाठी व सन 2020-21 या वर्षासाठी भारत सरकार शिष्यवृत्ती (GOI) व शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क (FREESHIP), राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक पाठयक्रमांशी संलग्न असलेल्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता मंजूर योजनेचे अर्ज भरण्यासाठी महाडिबीटी या पोर्टलवर दिनांक 20 ऑक्टोबर 2021 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली आहे.

         सर्व प्राचार्य, कर्मचारी व विद्यार्थी यांनी शिष्यवृत्तीचे अर्ज अचूक भरुन मंजूरीसाठी या कार्यालयास दिनांक 20 ऑक्टोबर 2021 पर्यंत ऑनलाईन सादर करण्याचे आवाहन सहायक आयुक्त, समाजकल्याण लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

 

                                                        

                                                    ****

 

 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु