खेलो इंडिया अंतर्गत कुस्ती मार्गदर्शकांच्या नियुक्तीसाठी आवश्यक कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन
खेलो
इंडिया अंतर्गत कुस्ती मार्गदर्शकांच्या नियुक्तीसाठी
आवश्यक
कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन
लातूर
दि.21(जिमाका):- भारत सरकार क्रीडा विभाग यांनी खेळाच्या
विकासाकरीता सर्व राज्यात विविध जिल्ह्यात विविध खेळांचे प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यासा
मंजूरी दिली आहे. या प्रशिक्षणातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण होतील. या
उद्देशाने ‘खेलो
इंडिया’ कुस्ती प्रशिक्षण केंद्र लातूर या ठिकाणी मान्यता देण्यात आली आहे. त्या करीता
मानधन तत्वावर कुस्ती मार्गदर्शक नियुक्ती करावयाचे आहे. मार्गदर्शकाची पात्रता पूढील
प्रमाणे आहे.
ऑलिम्पींक
/ एशियन गेम्स / जागतिक अजिंक्यपद, अधिकृत स्पर्धा सहभाग, पदक / प्राप्त आणि प्रशिक्षणाचा
अनुभवासह जागतिक करंडक स्पर्धा / एशियन चेम्पियनशिप / साऊथ एशियन स्पर्धा / संबंधित
खेळाच्या अधिकृत आंतरराष्ट्रीय स्पर्धा सहभाग / पदक प्राप्त खेळाडु- प्रशिक्षणाच्या
अनुभवासह राष्ट्रीय किंवा राज्य पुरस्कारार्थी प्रशिक्षणाच्या अनुभवासह एन.आय.एस.पदविका
किंवा संबधीत खेळाचे अधिकृत लेवल कोर्सेस किंवा बी.पी.एड.एम.पी.एड, राष्ट्रीय स्पर्धा
पदक प्राप्त किंवा नॅशलन गेम्स पदक प्राप्त- प्रशिक्षणाच्या अनुभवासह राज्यस्तर खेळाडू
बी.पी.एड, एम.पी.एड.दहा वर्षाचा प्रशिक्षणाचा अनुभव, प्रशिक्षकाचे वय 18 ते 45 वर्ष,
अशा पात्रता धारकांनी आपले अर्ज, शैक्षणिक पात्रता व खेळाच्या प्रमाणपत्रासह जिल्हा
क्रीडा अधिकारी कार्यालयात दि. 29 ऑक्टोबर 2021 कार्यालयीन वेळेत सादर करावेत, असे
आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी लातूर यांनी एका
प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
****
Comments
Post a Comment