वाचन प्रेरणा दिना निमित्त ग्रंथ प्रदर्शन

 

                             वाचन प्रेरणा दिनानिमित्त ग्रंथ प्रदर्शन

लातूर दि.22(जिमाका):- माजी राष्ट्रपती भारतरत्न स्व. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने दिनांक 15 ऑक्टोबर हा त्यांचा जन्म दिवस ‘वाचन प्रेरणा दिन’म्हणून साजरा केला जातो. त्याचे औचित्य साधुन वाचकांना वाचनाची आवड निर्माण व्हावी. ग्रंथालयीन ग्रंथांची ओळख व्हावी या उद्देशाने जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय लातूर येथे ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन दि. 20 ऑक्टोबर 2021  ते 22 ऑक्टोबर 2021 या कालावधीत करण्यात आले. 

या ग्रंथ प्रदर्शनामध्ये डॉ. ए.पी.जी. अब्दुल कलाम यांनी लिहिलेले त्यांच्यावरती लिहिलेले तसेच अनेक नामवंत लेखकांच्या नामवंत ग्रंथाचे प्रदर्शन भरवण्यात आले होते.

या ग्रंथ प्रदर्शनाचे जिल्हा माहिती अधिकारी श्री.युवराज पाटील यांच्या हस्ते डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन व फित कापून उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी जिल्हा ग्रंथालय अधिकारी ओ. सुनिल जगभारे, कार्यालयाचे श्री. सोपान मुंडे, हरिश्चंद्र डेंगळे,हीरालाल पाटील व वाचक वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते. या प्रसंगी जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी वाचनाचे महत्व विषद करुन विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले.




Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा