ऐतिहासीक व सांस्कृतिक वारशाचे जतन करून लातूरच्या सर्वांगीण विकासाला गती देणार --- पालकमंत्री अमित देशमुख यांची ग्वाही
ऐतिहासीक व सांस्कृतिक
वारशाचे
जतन करून लातूरच्या
सर्वांगीण विकासाला गती देणार
--- पालकमंत्री अमित
देशमुख यांची ग्वाही
▪ गंजगोलाई व परीसराच्या विकसासाठी शंभर कोटीचा अराखडा तयार करावा
▪ एमएमआरडीए च्या धर्तीवर एलएमआरडीए चा विचार
▪ महिलांची सुरक्षितता लक्षात घेऊन त्यांना मनपाकडून मोफत शहर वाहतुक
व्यवस्था
▪ शहरात लवकरच पाईपलाईन द्वारे गॅस मिळण्याची व्यवस्था
▪ महापालिका हद्दवाढीची प्रक्रीया सुरू झाल्यामुळे नवीनवस्तीमध्ये मुलभूत
सुविधा मिळणार
▪३१ डिंसेबर पुर्वी लातूर शहरात शंभर टक्के लसीकरण पूर्ण व्हावे
लातूर दि.15 ( जिमाका ) :- लातूरच्या ऐतिहासीक व सांस्कृतिक वारसाचे जतन आणि संवर्धन करून शहराच्या सर्वांगीण विकासाला चालना दिली जाईल अशी ग्वाही लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी दिली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील वैशीष्ट्येपूर्ण
रचना असलेल्या लातूर येथील गंजगेालाई या बाजारपेठेच्या वास्तुला नुकतीच शंभर वर्ष पूर्ण
झाली आहेत. शताब्दी वर्षाच्यानिमीत्ताने गंजगोलाईचे सुशोभिकरण करण्याची सुचना पालकमंत्री
अमित देशमुख यांनी केली होती. सुशोभिकरणाचे हे काम आता पूर्ण झाले असून अत्यंत प्रेक्षणीय
झालेल्या या वास्तुचे आज विजयादशमीच्या निमित्ताने आणि या शुभमुहूर्तावर पालकमंत्री
देशमुख यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर
विक्रांत गोजमगुंडे होते. यावेळी उपमहापौर
चंद्रकांत बिराजदार, विरोंधी पक्षनेते दिपक सुळ, ॲड. किरण जाधव, नगरसेवक अशोक गोविंदपूरकर,
युनुस मोमिन, अमजदखां पठाण, रविशंकर जाधव, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे, विजयकुमार
साबदे, गंजगोलाई व्यापारी असोशिएशनचे अध्यक्ष रईस टाके यांच्यासह विविध संस्था, संघटनाचे
पदाधिकारी व अनेक मान्यवर उपसिथत होते.
लातूर शहराला थोर असा ऐतिहासीक, सांस्कृतिक, राजकीय वारसा आहे. त्याचे जतन आणि संवर्धन करण्याचा नेहमीच प्रयत्न झाला असल्यामुळे येथे सामाजिक सलोखा टिकून आहे. शहर अत्यंत वेगाने प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे असे नमूद करून हा वारसा आणि संस्कृती जपण्याचे काम भविष्यातही होत राहील असे पालकमंत्री अमित देशमुख यांनी यावेळी बोलतांना म्हटले आहे.
गंजगोलाई व परिसराच्या
विकसासाठी
शंभर कोटीचा आराखडा
तयार करावा
गंजगोलाईचे सुशोभिकरण अत्यंत उत्कृष्ट झाले असल्याचे नमूद करून या संपूर्ण बाजारपेठेचा नुतनीकरण आणि सुशोभिकरण करण्यासाठी शंभर कोटीचा अराखड तयार करावा, त्यात रस्ते, स्कायवॉक, सीसीटीव्ही, पार्कीग या गोष्टीचा समावेश करावा. या प्रकल्पासाठी शासनाच्या वतीने सर्वेतोपरी सहकार्य करण्यात येईल. गंजगोलाईला ऐतिहासीक वास्तुचा दर्जा प्राप्त करून देऊन तिच्या संवर्धनासाठी पुराततत्व विभागाकडूनही निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल असे आश्वासन पालकमंत्री ना. देशमुख यांनी दिले.
महापालीका हद्दवाढीची
प्रक्रीया सुरू झाल्यामुळे
नवीन वस्तीमध्ये
मुलभूत सुविधा मिळणार
लातूर शहर व परिसराचा विकास करण्यासाठी
लातूर महापालिकेची हद्द वाढ करण्याची प्रक्रीया सुरू झाली असून त्यामुळे शहरानजीकच्या
भागात मुलभुत सुविधा पुरवणे शक्य होणार आहे. यातून शहराचा सुनियंत्रीत विकास होणार
असल्यामुळे भविष्यात अनेक अडचणी दूर होणार आहेत, यासाठी एमएमआरडीएच्या धर्तीवर लातूरसाठी
एलएमआरडीए स्थापन करता येते का यादृष्टीने विचार केला जाईल असेही पालकमंत्री देशमुख
यांनी म्हटले आहे.
शहरात लवकरच पाईपलाईन द्वारे गॅस मिळण्याची व्यवस्था
लातूरच्या विकसाला आता गती मिळाली असून शहरात लवकरच पाईपलाईन द्वारे गॅसचा पुरवठा केला जाणार आहे. त्या कामाचे भुमिपूजन लवकरच करण्यात येणार असून येथील उद्योगालाही त्याचा फायदा होणार आहे. औसा तालुक्यात इंधनावर आधारीत नवीन औद्योगिक वसाहत स्थापण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महिलांची सुरक्षितता
लक्षात घेऊन त्यांना
मनपाकडून मोफत शहर
वाहतुक व्यवस्था
लातूर महापालिकेने महिलांसाठी
मोफत शहर वाहतुक बस सुविधा उपलब्ध करून दिल्या बद्दल अभिनंदन करून अशी सुविधा देणारे
लातूर हे महाराष्ट्रातील पहिले शहर ठरले आहे. या उपक्रमाचे आता राज्यात अनुकरण होईल
असेही ना. देशमुख म्हणाले.
३१ डिंसेबर पुर्वी
लातूर शहरात
शंभर टक्के लसीकरण
पूर्ण व्हावे
कोरोना महामारीतून आत आपण बाहेर पडत अहोत. लसीकरणाचा वेग वाडल्यामुळे कोरोनाची
तिसरी लाट थोपवण्यात आपणाला यश मिळत आहे. ही बाब लक्षात घेऊन लातूर शहरात ३१ डिंसेबरपूर्वी
शंभर टक्के लसीकरण करावे अशा सुचना आपण दिल्या आहेत. त्या दृष्टीने शासन, महापालिका
प्रशासन प्रयत्न करीत आहे. हे प्रयत्न अधिक गतीने झाल्यास यावर्षा अखेर शंभर टक्के
लसीकरण करणारे लातूर हे महाराष्ट्रातील पहिले शहर ठरेल असेही ना. देशमुख यांनी म्हटले
आहे.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक करतांना महापौर विक्राम गोजमगुंडे यांनी लातूर शहरात
राबविण्यात येत असलेल्या विविध विकास प्रकल्पाची माहिती देऊन सर्वांना विजयादशमी व
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी शेवटी
सर्वांचे आभार मानले
0000
Comments
Post a Comment