*प्रमाणपत्रासाठी शपथपत्र, घोषणापत्र* *सादर करण्यासाठी साध्या कागदावर अर्ज करावा* -- मुद्रांक जिल्हाधिकारी ध. ज. माईनकर

 

*प्रमाणपत्रासाठी शपथपत्र, घोषणापत्र*

*सादर करण्यासाठी साध्या कागदावर अर्ज करावा*

-- मुद्रांक जिल्हाधिकारी ध. ज. माईनकर

लातूर दि.8 ( जिमाका ):- जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी , वास्तव्य प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र इत्यादी काढण्यासाठी मुद्रांक कागदावर अर्ज अथवा शपथपत्र , घोषणपत्र सादर करण्यासाठी मुद्रांकाची (स्टँम्प पेपर) ऐवजी साध्या कागदावर अर्ज करावा, असे आवाहन मुद्रांक जिल्हाधिकारी ध. ज. माईनकर यांनी केले आहे.

स्टँम्प पेपर मिळत नसल्याने विविध प्रमाणपत्रे काढण्यात अडचणी येत आहेत. तसेच प्रतिज्ञापत्रासाठी लागणारे स्टँम्प पेपर मिळत नाहीत, अशा जनतेच्या तक्रारी येत आहेत. शासनाने सन 2004 मध्ये याची दक्षता घेवून असे दाखले व प्रमाणपत्र लागणारे शपथपत्र व घोषणापत्रासाठी घेत असलेले मुद्रांक शुल्क माफ केले आहे. त्यामुळे विविध प्रमाणपत्र काढण्यासाठी साध्या कागदावर प्रतिज्ञापत्र सादर करणे अभिप्रेत आहे.

स्टँम्प , मुद्रांक कागदावरच प्रतिज्ञापत्र, शपथपत्र, घोषणापत्र सादर करण्याची कुणी मागणी करीत असेल तर मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन मुद्रांक जिल्हाधिकारी ध. ज. माईनकर यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु