शहरातील अंतर्गत रस्ते, नाल्या, विविध प्रलंबित विकास कामे लवकरात लवकर करण्याचे निर्देश राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली नगर पंचायत जळकोट येथे आढावा बैठक संपन्न

 

शहरातील अंतर्गत रस्ते, नाल्या, विविध प्रलंबित

विकास कामे लवकरात लवकर करण्याचे निर्देश

 

*राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली नगर पंचायत जळकोट येथे आढावा बैठक संपन्न

 

लातूर,दि.29 (जिमाका) नगर पंचायत जळकोट येथे जळकोट नगर पंचायत कार्यालय अंतर्गत विविध योजनेंतर्गत चालू असलेच्या विकास कामासंबंधी तसेच प्रलंबित कामे या विषयावर नगर पंचायत कार्यालय जळकोट येथे राज्याचे पर्यावरण, पाणीपुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन व संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली  नुकतीच आढावा बैठक घेतली.

यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी जळकोट शहरासाठी वैशिष्यपूर्ण योजने अंतर्गत मंजूर लिंगायत भवन, बौध्द विहार, अण्णाभाऊ साठे सभागृह याबाबत कामाची सद्यस्थिती जागा उपलब्धते बाबत आढावा घेतला. त्याचप्रमाणे नवीन नगर पंचायत हाय्य योजना अंतर्गत शादिखाना, शिवाजी महाराज सभागृह याविषयी राज्यमंत्री श्री.बनसोडे यांनी आढावा घेतला.

तसेच नगर पंचायत जळकोट पा.पुरवठा विभाग, शहरातील अंतर्गत रस्ते, नाल्या, विविध प्रलंबित विकास कामे लवकरात लवकर करण्याचे निर्देश संबंधित कर्मचाऱ्यांना त्यांनी दिले. यावेळी नगर पंचायत जळकोट चे प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, मुख्याधिकारी भारत राठोड, तहसीलदार सुरेखा स्वामी, पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी, महावितरण चे अधिकारी तसेच मन्मथ किडे, अर्जुन आगलावे,मारोती पांडे, संगम टाले, माजी नगरसेवक उस्मान मोमीन, महेश धुळशेटे, डॉ. काळे, तसेच गोविंद भ्रमणा, धनंजय भ्रमन्ना, मोरोती गबाळे, नामवाड संग्राम, युनुस तांबोळी व इतर गावातील प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते.

 

                                               





 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु