कोरोना प्रादूर्भाव टाळण्यासाठी प्रत्येकाने लस घेऊन स्वत:ला सुरक्षित करुन घ्यावे --- जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी.

सुधारित वृत्त :-
कोरोना प्रादूर्भाव टाळण्यासाठी प्रत्येकाने लस घेऊन स्वत:ला सुरक्षित करुन घ्यावे
--- जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी.

 ‘मिशन कवचकुंडल’ मोहिमेंतर्गत जिल्ह्यात आजपर्यंत पहिला व दुसरा डोस -49 हजार 504 नागरिकांचे लसीकरण
 उवरित दि. 12 ते 14 ऑक्टोबर, 2021 या तीन दिवसांच्या कालावधीत नागरिकांनी भरभरुन प्रतिसाद द्यावा.
 मिशन कवच कुंडल मोहिमेतंर्गत जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयात लसीकरण सुरु


लातूर दि.12 (जिमाका):- कोरोनाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी प्रत्येकाने लस घेऊन स्वत:ला सुरक्षित करुन घ्यावे, असे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी आवाहन केले आहे.

राज्यात लसीकरण मोठ्या प्रमाणात होण्यासाठी शासनाच्या सूचनेनुसार लातुर जिल्ह्यामध्ये मिशन कवच कुंडल ही मोहीम राबविली जात आहे. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी सर्व विभागप्रमुख आयएमए, व्हीएसटीएस यांची बैठक घेऊन सर्व विभागांना सक्रिय सहभाग घ्यावा, असेही आवाहन केले आहे.

ही मोहिम दि. 8 ते 14 ऑक्टोबर 2021 या कालावधीत मिशन कुंडल कवच मोहिम जिल्हयात राबविण्यात येत आहे. या कालावधीतील म्हणजेच दि.8 ते 11 ऑक्टोबर दरम्यान आरोग्य विभागामार्फत जिल्हयामध्ये पहिला व दुसऱा डोस नागरीकांना एकूण 49 हजार 504 नागरीकांना देण्यात आले आहेत.

दिनांक 8 ऑक्टोबर 2021 रोजी पहिल्या दिवशी लसीकरणाचा पहिला व दुसरा डोस – 10 हजार 235 , दिनांक 9 ऑक्टोबर 2021 रोजी दुसऱ्या दिवशी लसीकरणाचा पहिला व दुसरा डोस 13 हजार 152, दिनांक 10 ऑक्टोबर 2021 रोजी तिसऱ्या दिवशी लसीकरणाचा पहिला व दुसरा डोस 9 हजार 947, दिनांक 11 ऑक्टोबर 2021 रोजी चौथ्या दिवशी लसीकरणाचा पहिला व दुसरा डोस 16 हजार 170 लसीकरण झाले आहेत.

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा