आजादी का अमृत महोत्सव’ निमित्त मौजे चाटा, बोरगांव, हरंगुळ व मतिमंद* *विद्यालय लातूर येथे कायदेविषयक शिबीर संपन्न

 

 ‘आजादी का अमृत महोत्सव’ निमित्त मौजे चाटा, बोरगांव, हरंगुळ व मतिमंद* *विद्यालय लातूर येथे कायदेविषयक शिबीर संपन्न

 

             लातूर दि.13(जिमाका):-सर्वोच्च न्यायालय व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार दि. 2 ऑक्टोबर 2021 ते 14 नोव्हेंबर 2021 या कलावधीमध्ये आजादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमाअंतर्गत लातूर जिल्हयामध्ये गावोगावी कायदेविषयक जनजागृती शिबीराचे आयोजन करण्यात येत आहे. त्यानिमित्त दि. 10 ऑक्टोबर 2021 रोजी मोजे चाटा, बोरगांव, हरंगुळ, मतिमंद विद्यालय, एमआयडीसी लातूर येथे आजादी का अमृत महोत्सवांतर्गत कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर संपन्न झाले.

          मौजे चाटा, बोरगाव हरंगुळ, मतिमंद विद्यालय, एमआयडीसी लातूर येथे सार्वजनिक उपयोगिता सेवांवर जागरुकता शिबीरात नालसा योजना बाबतची माहिती, पिडीतांसाठी नुकसान भरपाई योजना, मोफत कायदेविषयक माहिती व सल्ला, (मनोरुग्ण्‍ आणि मानसिक अपंग व्यक्तीकरीता) योजना, 2015, लैंगीक अत्याचार / इतर गुन्हयामधील बळी पडलेल्या / त्यातून बचावलेल्या महिलांकरीता नुकसान भरपाई योजना 2018, प्रदुषण मुक्त पाणी व हवा, शिक्षण अधिकार, विधी सेवा प्राधिकरण कायदेविषयक माहिती व सल्ला या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

       या कार्यक्रमास न्यायाधीश एन.आर. तळेकर, दिवाणी न्यायाधीश व स्तर, न्यायाधीश, पी.डी.कोळेकर 2 रे सहदिवाणी न्यायाधीश क, स्तर, न्यायाधीश श्रीमती ए.एम.शिंदे, 4 थे सहदिवाणी न्यायाधीश क.स्तर, तसेच श्री.गायकवाड आर. वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता, सतिष भापकर एस. जिल्हा समन्वयक, जयसिंहरावजी देशमुख, अध्यक्ष, नरेंद्रजी अग्रवाल, सचिव अभयजी शहा, संचालक संजय निलेगावकर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे पॅनल ॲडव्होकेटस ॲङएस.व्ही. सलगरे, ॲड. अजय कलशेट्टी,ॲड.रमेश कुचमे उपस्ति होते. मौजे चाटा,बोरगाव,हरंगुळ, ता.जि. लातूर येथील सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य,ग्रामसेवक आणि उपरोक्त तिन्ही गावच्या आसपासच्या खेडयातील नागरिक, महिला व मतिमंद विद्यालयाचे विद्यार्थी, पालक उपस्थित होते.

           या कार्यक्रमात मतिमंद विद्यालय, एमआयडीसी लातूर येथे न्यायाधीश एन.आर. तळेकर यांनी (मनोरुग्ण्‍ आणि मानसिक अपंग व्यक्तीकरीता) योजना यावर अत्यंत बहुमोल मार्गदर्शन केले व सतिष भापकर यांनी मनोरुग्ण्‍ व मानसिक रुग्ण्‍ यांना असलेल्या विविध योजना विषयी मार्गदर्शन केले.

       मौजे बोरगाव येथे न्यायाधीश पी.डी.कोळेकरउपस्थित ग्रामस्थांना मोफत कायदेविषयक माहिती व सल्ला आणि पिडीतांसाठी नुकसान भरपाई योजना याविषयांवर सखोल असे मार्गदर्शन केले ,ॲड रमेश कुचमे यांनी महाराष्ट्र  विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कायदेविषयक माहिती व सल्ला यावर सविस्तर असे विवेचन केले.

      मौजे चाटा येथे न्यायाधीश श्रीमती ए.एम. शिंदे यांनी शिक्षणाचे अधिकार व नालसा योजनाबाबतची परिपुर्ण माहिती या कार्यक्रम स्थळी उपस्थित असलेल्या नागरीकांना दिली.

      मौजे हरंगुळ (बु) येथे यांनी ॲड एस.व्ही.सलगरे यांनी लैगीक अत्याचार / इतर गुन्यामधील बळी पडलेल्या / त्यातून बचावलेल्या महिलांकरिता नुकसान भरपाई योजना 2018 व ॲड. अजय कलशेट्टी यांनी प्रदुषण मुक्त पाणी व हवा, जेष्ठ नागरिकांचे अधिकार या विषयी सविस्तर माहिती दिली.

      कायदेविषयक जनजागृती घडवून आणण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथील न्यायिक कर्मचारी पॅनल विधीज्ञ, ग्रामपंचायत मधील कर्मचारी व तसेच मौ. चाटा, बोरगांव, हरंगूळ येथील ग्रामस्थ व मतिमंद विद्यालय, एमआयडीसी लातूर येथील संचालक व विद्यालयाने  विशेष परिश्रम घेवून हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला.

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु