विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पीएसए ऑक्सीजन प्लॅन्टचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न
विलासराव देशमुख
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पीएसए ऑक्सीजन प्लॅन्टचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांच्या
हस्ते उद्घाटन संपन्न
लातूर,दि.7(जिमाका) येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे आज जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या हस्ते PSA OXYGEN PLANT चे उद्घाटन संपन्न झाले.
याकार्यक्रमास
अधिष्ठाता,डॉ.सुधीर देशमुख, जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ.लक्ष्मण देशमुख, उपजिल्हाधिकारी
जीवन देसाई विभागप्रमुख बधिरीकरणशास्त्र, डॉ. शैलेंद्र चौहाण वैद्यकीय
अधिक्षक डॉ. संतोषकुमार डोपे, अति. वैद्यकीय
अधिक्षक, डॉ. महादेव बनसुडे, प्रभारी पीएसए ऑक्सीजन प्लँन्टचे डॉ. व्यंकटेश जोशी व ईतर विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी अधिष्ठाता
डॉ. सुधीर देशमुख यांनी कोविड-19 च्या तिस-या लाटेची पुर्वतयारी म्हणुन ऑक्सीजनची कमरता
भासू नये यासाठी जिल्हाधिकारी यांनी संस्थेसाठी
2000 ली. प्र. मि. क्षमतेचा PSA OXYGEN PLANT मंजूर केल्याबद्दल संस्थेच्या वतीने आभार
मानले. तसेच संस्थेतील रुग्णांसाठी वाढीव दोन 20 K. L. चे लिक्वीड
मेडीकल ऑक्सीजन टँक मंजूर केले असून नक्कीच याचा फायदा मोठया प्रमाणात रुग्णांसाठी
होईल असे सांगुन जिल्हा प्रशासनाचे आभार मानले.
या कामासाठी
वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य तथा पालकमंत्री अमित विलासरावजी देशमुख यांनी वेळोवळी केलेल्या मार्गदर्शनामुळे ऑक्सीजन
प्लँन्ट वेळेत कार्यान्वित करण्यात आला अशी माहिती देवून पालकमंत्री श्री. देशमुख यांचे
अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी आभार मानले.
जिल्हाधिकारी
पृथ्वीराज बी. पी. यांनी हा ऑक्सीजन प्लँन्ट कार्यान्वित करण्यासाठी विलासराव देशमुख
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी केलेल्या कामाबाबत
आभार मानले. तसेच हा प्लॅन्ट Hon. P. M. Care Fund व Natioinal Highway Authority
of India यांच्या माध्यमातुन सी. एस. आर. निधीमधुन प्राप्त झाल्यामुळे संरक्षण संशोधन
आणि विकास संस्था(DRDO), यांचे आभार मानले. या कामास उपजिल्हाधिकरी जीवन देसाई, सहयोगी
प्राध्यापक बधिरीकरणशास्त्र विभाग डॉ. विनायक सिरसाट, सार्वजनिक बांधकाम (विद्युत)
विभागचे उप अभियंता श्री. मसुरकर, राष्ट्रीय महामार्गाचे अभियंता श्री. माने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता, श्री. आवाळे
यांनी समन्वयाने कामकाज पार पाडल्याबाबत सर्वांचे आभार जिल्हाधिकारी यांनी मानले.
जिल्हयामध्ये दिनांक 08 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर कोविड-19 लसीकरण
जनजागृती सप्ताह राबविण्यात येणार असून नागरीकांनी जास्तीत जास्त लसीकरण करुन घेण्याबाबत
जनजागृती करण्यात यावी असे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी
पृथ्वीराज बी. पी. यांनी केले. या कार्यक्रमाचे
आभार प्रदर्शन डॉ. दिपक कोकणे यांनी केले.
Comments
Post a Comment