जिल्हयातील प्रत्येक तालुक्यामध्ये देवणी जातीच्या गायींच्या दुग्धस्पर्धा आयेाजन

 

*जिल्हयातील प्रत्येक तालुक्यामध्ये देवणी जातीच्या*

*गायींच्या दुग्धस्पर्धा आयेाजन*

 

लातूर दि.13(जिमाका):- सन 2021-22 करीता देवणी गोवंश संवर्धनासाठी जिल्हा परिषद उपकर योजनेतून जिल्हयातील जास्तीत जास्त दुध उत्पादन देणाऱ्या देवणी जातीच्या गाईचे संवर्धन करण्यासाठी या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार असून या योजनेमध्ये जिल्हयातील प्रत्येक तालुक्यामध्ये देवणी जातीच्या गायींच्या  दुग्ध्‍ स्पर्धा  आयोजित करण्यात येणार आहे.

या योजनेसाठी पूढील प्रमाणे मार्गदर्शक सुचना आहेत. प्रत्येक तालुक्यामध्ये देवणी जातीच्या किमान 6 लीटर प्रती दिन पेक्षा जास्त दुध देणाऱ्या गाईच्या पशुपालकांना यामध्ये सहभागी होता येईल. सदर दुग्ध्‍ स्पर्धा मध्ये देवणी जातीच्या जातीवंत गुणधर्म असलेल्याच गायींची दुग्ध्‍ स्पर्धा वर्षातुन 4 वेळा तीन महिन्याच्या अंतराने घेण्यात यईल्. दुग्ध्‍ स्पर्धामध्ये भाग घेणाऱ्या गाईची INAPH प्रणालीमध्ये टॅग नंबरसह नोंदणी बंधनकारक असेल. GPS आधारीत मशीन व्दारे दुग्ध्‍ स्पर्धेतील सहभागी देवणी गायींच्या दुग्ध्‍ उत्पादनाची नोंद करण्यात येईल.

विहित नमुण्यातील दुग्ध्‍ स्पर्धेसाठीचा अर्ज नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये उपलब्ध्‍ असेल व पशुपालकांनी तो अर्ज भरुन दुग्ध्‍ स्पर्धेच्या आयोजनाच्या वेळापत्रकानुसार संबंधित पशुवैद्यकीय दवाखान्याच्या संस्थाप्रमुखांकडे सादर करावा. प्राथमिक स्तरावर दुग्ध्‍ नोंदणी पशुवैद्यकीय संस्था स्तरावर संबधित संस्थाप्रमुख व पशुपालक यांच्या उपस्थित होईल. त्यानंतर आठ दिवसात तालुकास्तरावर 08 लीटर पेक्षा अधिक दुध देणाऱ्या देवणी गाईची निवड समितीमार्फत दुग्ध्‍ स्पर्धांच्या निकषानुसार पशुपालकांच्या दारातच दुग्ध्‍ उत्पादनाच्या नोंदी घेण्यात येतील असे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

                                                        ****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु