कोविडमुळे दोन्ही पालक गमावलेल्या पाच पाल्यांच्या खात्यात पैसे जमा ; एकल पालक गृह चौकशीचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

 

कोविडमुळे दोन्ही पालक गमावलेल्या

पाच पाल्यांच्या खात्यात पैसे जमा ;

एकल पालक गृह चौकशीचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

 

        
लातूर दि.13(जिमाका):-
कोरोनामुळे ज्या मुलां-मुलींचे दोन्ही पालक मृत्यू पडले आहेत, अशा पाच बालकांचे दायित्व शासनाने स्विकारले असून त्यांच्याशी संबंधितांच्या खात्यावर पाच लाख रुपये वर्ग केले आहेत. एकल पालक असलेल्या 285 बालकांच्या पैकी 208 बालकांच्या गृह चौकशी पूर्ण झाली आहेत. उर्वरित बालकांच्या घरी भेटी देवून त्यांच्या सुरक्षिततेची खात्री करुन घ्यावी , असे आदेश जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी आज दिले.

         येथील जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड- 19 या आजारामुळे पालक गमावलेल्या बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी जिल्हास्तरीय कृतीदल (टास्क फोर्स) बैठक जिल्हाधिकारी  पृथ्वीराज बी.पी. यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी वर्षा पवार, जिल्हा शल्य चिकित्सक                  डॉ. लक्ष्मण देशमुख, शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे, जिल्हा समन्वयक चाईल्ड लाईनच्या समन्वयक सदाम शेख, एस.ओ.एस. बालग्राम अधीक्षक मीरा सिंग, सामाजिक कार्यकर्ता, समितीचे सदस्य आदि संबंधित विभागाच्या विभाग प्रमुखांची यावेळी  उपस्थिती होती.

       जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. बैठकीत  बोलताना म्हणाले की, लातूर जिल्ह्यातील कोविड-19 आजाराने एक पालक गमावलेल्या बालकाबाबत बालसंगोपन योजनेचा लाभ 285 संख्या असून त्यापैकी 125 बालकांना लाभ मिळालेला आहे. जिल्ह्यातील कोविड-19 आजाराने दोन्ही पालक गमावलेल्या (अनाथ) बालकाबाबत पाच बालकांना बालसंगोपन योजनेचे अर्थसहाय्य मिळालेल्या बालकांना म्हणजेच दोन बालके यांना राईट टू एज्युकेशन कायद्यातंर्गत प्रवेश देण्यात आलेला आहे. दोन बालकांची शालेय फिसबाबत महिला व बालविकास विभागाचे आयुक्त यांना याबाबतची माहिती कळविण्यात आलेली आहे. तसेच एक जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी नरसिंहराव चव्हाण माध्यमिक विद्यालय, नळगांव या संस्थेच्या मुख्याध्यापकांना मुलाबाबत पूर्ण माहिती देवून फिस माफ करण्यात यावे, असे सांगितले या मुलांची फिस माफ करण्यात आलेली आहे. या पाचही बालकांना दिनांक 17 जून, 2021 शासन निर्णयानुसार अनाथ बालकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आलेली आहे.

       पी. एम. केअर फंड अंतर्गत दोन्ही पालक गामावलेल्या बालक एकूण 12 बालकांचा समावेश केला होता. त्यातील सात बालके ही बाहेर जिल्ह्यातील असल्याने त्या-त्या समन्वयकाशी संपर्क साधून ऑनलाईन प्रणालमधून डिलीट करण्यात आलेले आहेत.

      जिल्ह्यातील कोविड-19 या आजारामुळे विधवा झालेल्या महिलांची 0 ते 18 वयोगटातील बालकांच्या विधवा आईची संख्या एकूण 263 महिला पात्र झाल्या आहेत. त्यांना एसओएस संस्थेमार्फत धान्य वाटप केलेल्या विधवा महिलांची संख्या एकूण 140 अशी आहे. 

जिल्हा बाल कल्याण समितीच्या कामाबद्दल नाराजी

      जिल्हा बाल कल्याण समितीने ज्या गतीने काम करणे आवश्यक आहे. त्या गतीने काम करत नसल्यामुळे अनेक प्रकरणे प्रलंबित राहिल्याबद्दल जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी नाराजी व्यक्त केली आणि प्रकरणे तात्काळ निकाली काढावेत, अशाही सुचना जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी दिल्या.

0000

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा