जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, लातूर यांच्या मार्फत जिल्हा कारागृह, लातूर येथे बंद्यासाठी भव्य योगासन व प्राणायाम प्रशिक्षण शिबीर संपन्न

 

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, लातूर यांच्या मार्फत जिल्हा कारागृह, लातूर येथे

बंद्यासाठी भव्य योगासन व प्राणायाम प्रशिक्षण शिबीर संपन्न

 

लातूर,दि.27 (जिमाका) मा. सर्वोच्च न्यायालय व मा. महाराष्ट्र  राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार दि. 02 ऑक्टोबर 2021 ते दि. 14 नोव्हेंबर 2021 या कालावधीमध्ये आजादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमानिमित्त नुकतेच लातूर जिल्हा कारागृहात बंद्यांना योगासन प्राणायाम प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. 

निरोगी राहण्यासाठी योगासन अत्यंत गरजेचे आहे. योगासन व प्राणायामचे आपल्या जिवनात अनन्य साधारण महत्व आहे. यासाठी बंद्यायाचे जिवन सुध्दा निरोगी रहावे या निमित्ताने जिल्हा विधी सेवा प्राधिकरण लातूर यांच्या मार्फत जिल्हा कारागृहात योगासन शिबीर घेण्यात आले.

या कार्यक्रमास सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे श्रीमती. एस.डी.अवसेकर आवर्जुन उपस्थित होत्या. त्यांनी योगासन शिबीरात बंद्यांना योगासनाचे महत्व पटवुन दिले. यामध्ये बोलत असताना त्यांनी माणसाला जसे जिवंत राहण्यासाठी हवा, पाणी, अन्न हे गरजेचे आहे तसेच आपले शरिर निरोगी ठेवण्यासाठी शरिराला योगासन देखील तितकेच महत्वाचे आहे हे सांगितले. स्वत:च्या शरिरासाठी म्हणावा तेवढा वेळ आपण देत नाहीत, व्यायाम करत नाहीत त्यामुळे आपल्या शरिराच्या तक्रारी वाढत जातात व आपण आजारी पडतोत. त्यामुळे आपणाला जर आपले शरिर निरोगी ठेवायचे असेल, कमवलेला पैसा वाचवायचा असेल,आपले आर्युमान वाढवायचे असेल तसेच मानसिक संतुलन राखायचे असेल आणि होणारा ता-तणाव कमी करायचा असेल तर योगासन व प्राणायाम याशिवाय पर्याय नाही. प्राणायाम व योगासनामुळे शरीर स्वस्थ व चैतन्यमय राहते हे त्यांनी आवर्जुन सांगितले.

तसेच सदरचे योगासन व प्राणायाम शिबीरात योग प्रशिक्षक दिपक गटागट व श्रीमती आशा सोमनाथ झुंजे (भुसनुरे) यांनी बंद्यांना योगासन व प्राणायाम याचे प्रशिक्षण दिले. यांच्या सोगत त्यांच्या मदतीसाठी 4-5 सहकारी प्रशिक्षण शिबीरास उपस्थित होते. यावेळी यांनी कारागृहातील बंद्यांसाठी प्राणायामार्थी आठ प्रकार यात भस्त्रिका, कपालभाती, बाहय, अग्निसार, उज्जायी प्राणायाम, अनुलोम-विलोम, भ्रामरी, उदगीथ्- प्रणव (ध्यान)- ओंकार याचे प्रशिक्षण दिले. याचबरोबर सुर्यनमस्कार, नटराजासन, हस्तपाद अंगुठासन, ध्रुवासन, वृक्षासन, गरुडासन, ताडासन, उर्ध्वताडासन, त्रिर्यकताडासन, कटीचक्रासन, त्रिकोणासन,उत्कटासन, पादअगूस्ष्टासन हे उभे राहून करण्याचे योगासनाचे प्रशिक्षण दिले.

बसून करण्याचे योगासन यात पदद्यमासन, योगमुद्रासन, पर्वतासन, तुलासन, समकायासन, दंडासन, जानुशिरासन, वक्रासन, गोमुखासन, वज्रासन, कुर्मासन, अर्धचंद्रासन, आकर्णधनुरासन नाभी दर्शनासन इ.योगासन शिकवले.

याचबरोबर पाठीवर झोपून मर्कटासन, शवासन, पादवृतासन तसेच पोटावर बसूनमकरासन (दोन्ही) भुजंगासन, धनुरासन, शलभासन, तोलासन शिकवले. तसेच या कार्यक्रमास ॲड.अजय कलशेट्टी, ॲड.एस.व्ही.सलगरे, ॲड.कुचमे हे ही उपस्थित होते.यांनी बंद्यांना योगासनाचे महत्व पटवून दिले व योगासन व प्राणयाम करण्यास प्रोत्साहीत केले.

तसेच हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, लातूर येथील न्यायिक कर्मचारी, योगप्रशिक्षक व कारागृह प्रशासन यांनी विशेष परिश्रम घेतले व कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न केला.

                                                      ***

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा