आजादी का अमृत महोत्सव निमित्त “भारतभर जागरुकता व पोहोंच” या कार्यक्रमाचे उद्घाटन व रॅली संपन्न
आजादी का अमृत महोत्सव
निमित्त “भारतभर जागरुकता व पोहोंच”
या कार्यक्रमाचे
उद्घाटन व रॅली संपन्न
लातूर,दि.4 (जिमाका) सर्वोच्च न्यायालय
व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार दि.2 ऑक्टोबर
2021 ते 14 नोव्हेंबर 2021 या कालावधीमध्ये आजादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमानिमित्त
लातूर जिल्हयामध्ये गावोगावी कायदेविषयक जनजागृती शिबीराचे आयोजन करण्यात येत आहे.
त्यानिमित्त दि. 2 ऑक्टोबर 2021 रोजी राष्ट्रपिता
महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून आजादी का अमृत महोत्सव निमित्त “भारतभर जागरुकता व पोहोंच” या कार्यक्रमाची
सुरुवात सकाळी 7.30 वाजता जिल्हा न्यायालय लातूर ते गांधी चौक, या मार्गे प्रभात फेरी काढण्यात आली.गांधी चौक, येथे महात्मा गांधी
यांच्या पुतळयास अभिवादन करुन गांधी चौक, पोलिस स्टेशन परिसरामध्ये आजादी का अमृत महोत्सव
निमित्त भारतभर जागरुकता व पोहोंच या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा न्यायाधीश-1
चे न्या.ए.व्ही.गुजराथी, तसेच या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी पोलिस अधिक्षक निखील पिंगळे,अपर
जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, तसेच सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे श्रीमती एस.डी.
अवसेकर, प्रमुख उपस्थिती अध्यक्ष लातूर जिल्हा
विधीज्ञ मंडळ, आर.डी.काळे तसेच उपस्थित न्या.डी.पी. रागीट, न्या.जे.एम. दळवी, न्या.बी.सी.
कांबळे, न्या.एन.आर. तळेकर, न्या.जी.आर. ढेपे,न्या.के.एम. कायंनगुडे, न्या.एस.एन. भोसले,
न्या.व्ही.बी. गळवे पाटील, न्या.ए.ए. शेख,
न्या.ए.एस. मुंडे, न्या.ए.एस.आलेवार, न्या. श्रीमती ए.ए. पुंड, न्या. पी.डी. कोळेकर,
न्या.व्ही.एस. शिंदे, न्या.श्रीमती ए.एम.शिंदे,न्या.यु.ए. भोसले, न्या.श्रीमती ए.ए.
पिरजादे पाटील, न्या.श्रीमती के.बी. गाडीवाले, न्या. श्रीमती जी.जी. औटी, न्यायालयीन
व्यवस्थापक हरीश भोईटे, ॲड. एस.व्ही. सलगरे, ॲड.अजय कलशेट्टी, ॲड. शिवकुमार बनसोडे,ॲड.राजेंद्र
लातूरकर, ॲड.रमेश कुचमे, ॲड. छाया मलवाडे, ॲड. ज्योती यावलकर, ॲड. तृप्ती इटकरी, ॲड.
सारीका वायबसे,ॲड. अंजली जोशी, ॲड. किरणे चिंते,- पाटील, ॲड. विद्या वीर, इ. तसेच जिल्हा
न्यायालयातील सर्व कर्मचारी पी.एल. व्ही. दयानंद विधी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ.
श्रीमती शुभांगी पांचाळ व विद्यार्थी, जयक्रांती महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. अलगुले
व विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण श्रीमती एस.डी.
अवसेकर यांनी केले. प्रमुख अतिथी पोलिस अधिक्षक निखील पिंगळे यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण जिल्हा न्यायाधीश न्या. ए.व्ही. गुजराथी यांनी केले.अध्यक्ष
लातूर जिल्हा विधीज्ञ मंडळचे आर.डी.काळे यांनी कायदेविषयक मार्गदर्शन केले. सुत्रसंचलन
न्या. पी.डी.कोळेकर यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्रीमती. ए.ए. पिरजादे
पाटील यांनी केले.तसेच गांधी चौक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रेमप्रकाश माकोडे,
पोलीस निरीक्षक, वाहतुक शाखा सुनिल बिर्ला, पोलिस दामोदर मुळे तसेच न्यायालयीन कर्मचारी
यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले .
Comments
Post a Comment