जिल्हा कोषागार कार्यालय परिसरात वृक्षारोपनाचा कार्यक्रम संपन्न

 

जिल्हा कोषागार कार्यालय परिसरात

वृक्षारोपनाचा कार्यक्रम संपन्न

 

लातूर दि.12(जिमाका):-सन 2021 या वर्षासाठी 33 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत जिल्हा कोषागार कार्यालय लातूर येथे नुकताच वृक्षारोपनाचा कार्यक्रम जिल्हा कोषागार अधिकारी राधाकिसन राऊत यांच्या  प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला.

सन 2021 या वर्षासाठी जिल्हा कोषागार  कार्यालयातील प्रत्येक व्यक्तीमागे 3 वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट विभागाने ठरवून दिले आहे. सदरील उद्दिष्ट पुर्ण करण्याच्या  अनुषंगाने जिल्हा कोषागार कार्यालयाच्या समोरील व बाह्य बाजूस मोकळया जागेमध्ये वृक्ष लागवड करण्यात आली. या प्रसंगी जिल्हा कोषागार कार्यालयातील डी.एम. कुलकर्णी,एस.जी. धुमाळे, अप्पर कोषागार अधिकारी व इतर सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हा कोषागार अधिकारी  राधाकिसन राऊत यांनी वृक्षारोपनाच्या कार्यक्रमाची पार्श्वभूमी व उद्दीष्ट तसेच वृक्षारोपन केलेल्या रोपांच्या पालकत्वाची जबाबदारी कोषागारातील अधिकारी व कर्मचारी यांनी स्विकारुन वृक्ष संवर्धन व संगोपनाचे काम करण्याबाबत सूचित केले. हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिल्हा कोषागार कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

 

                                            ****

 

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा