उदगीर रिंग रोड, सीमा भागातील राष्ट्रीय महामार्गाला लवकरच मिळणार मंजूरी,केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांची, राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी घेतली भेट

 

उदगीर रिंग रोड, सीमा भागातील राष्ट्रीय महामार्गाला लवकरच मिळणार मंजूरी

केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांची

राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी घेतली भेट


लातूर,दि.27 (जिमाका):-
नुकतीच दिल्लीत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन उदगीर - जळकोट मतदार संघातील विविध रस्ते चौपदरीकरण करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी केली


मागील आठवड्यात या संदर्भात मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात बैठक घेण्यात आली होती. याचाच एक भाग म्हणून दिल्ली येथे बैठक घेण्यात आली. यावेळी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन  गडकरी  यांनी संबंधित विभागाला याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिली आहे.

उदगीर येथून जाणारे  प्रामुख्याने आष्टा मोड ते देगलूर रस्ता, वडगाव काटी ते तेलंगणा बॉर्डरपर्यंत  जाणारा रस्ता मंजूर करुन त्याच बरोबर दोन राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा उदगीर ते शिरूर रस्त्यासाठी निधी मंजूर करण्या सोबतच उदगीर शहराचा सर्वात महत्त्वाचा असलेला रिंग रोडचा प्रश्न मार्गी लावणे, आष्टा मोड ते तिवटग्याळपाटी चौपदरीकरण करणे यासह विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यासोबतच  मतदारसंघातील रस्ते विकासासाठी सी. आर. एफ. अंतर्गत  निधी उपलब्ध करण्याचीही मागणी केली.


यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी साहेब यांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद देऊन सर्व प्रस्तावित मागण्या तात्काळ मंजूर करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश  दिले आहेत. या बाबतची कार्यवाही त्वरित होणार आहे, अशीही माहिती राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिली आहे.

****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु