दिव्यांगांच्या कल्याणकारी योजना सर्वदूर पोहोचविण्यासाठी संवेदना लातूर संकेतस्थळाचे अद्यावतीकरण करण्याचे निर्देश --जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.

 

दिव्यांगांच्या कल्याणकारी योजना सर्वदूर पोहोचविण्यासाठी

 संवेदना लातूर संकेतस्थळाचे अद्यावतीकरण करण्याचे निर्देश

--जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.

 

§  अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या दिव्यांग व्यक्तींना सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांचा लाभ प्राधान्याने द्यावा.

§  दिव्यांग सहाय्यक भत्ता मिळण्याकरिता शासनाकडे पाठपुरावा करावा.

§  निरामय आरोग्य विमा योजनेसाठी जिल्ह्यातील बौद्धिक दिव्यांग व्यक्तींना प्रिमीयम जमा करण्याचा निर्णय

§  ग्रामीण भागातील दिव्यांगांसाठी वैद्यकीय तपासणी व उपचार शिबीराचे आय़ोजन करावे

§  जि.प.ने जिल्ह्यातील दिव्यांगांसाठी रोजगाराच्या दृष्टीने विविध विषयावर प्रशिक्षणाचे आयोजन

 


लातूर दि.25(जिमाका):-
दिव्यांगाच्या कल्याणकारी योजना तळागाळापर्यंत पोहचाव्यात यासाठी जागतिक दिव्यांग दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे निश्चित झाले. यामध्ये निरामय कार्ड वितरण, प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन, ग्रामीण भागात दिव्यांग व्यक्तींची वैद्यकीय तपासणी, संवेदना लातूर दिव्यांगांकरिता असणाऱ्या या वेबसाईटचे अद्यायवतीकरण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांना दिले. तसेच यासोबतच अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या दिव्यांग व्यक्तींना सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांचा लाभ प्राधान्याने देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.


जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, लातूरच्या जिल्हा व्यवस्थापन समितीची बैठक जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आज संपन्न झाली.  

          या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा शल्य चिकीत्सक कार्यालयाचे डॉ. माधव शिंदे, डॉ. एस. जी. पाठक, समाज कल्याण अधिकारी सुनिल खमितकर, श्री. कुंभार, श्री. गायकवाड, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाचे डॉ. कुलकर्णी, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे डॉ. योगेश निटुरकर, शिक्षण विभाग (माध्यमिक) चे प्रतिनिधी, सर्व शिक्षा अभियानचे जिल्हा समन्वय अंगद महानुरे, विभाग नियंत्रक राज्य परिवहन विभाग, सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण विभाग, कौशल्य विकास विभाग, दिव्यांग विकास महामंडळ, डीडीआरसीचे व्यंकट लामजणे, योगेश बुरांडे, अनुप दबडगावकर यांच्यासह आदि विविध संबंधित विभागाच्या विभाग प्रमुखांची यावेळी उपस्थिती होती.

         दिव्यांग सहाय्यक भत्ता मिळण्याकरिता शासनाकडे पाठपुरावा करण्याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी सांगितले. फिट्स येणाऱ्या बौद्धिक दिव्यांग व्यक्तींची तपासणी शिबीरे व औषध पुरवठा कऱण्याबाबतही निर्देश   जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी जिल्हा शल्य चिकीत्सक कार्यालयास दिले. 

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी जिल्हा परिषदेचा पाच टक्के दिव्यांग कल्याण निधीचा खर्च वैयक्तिक लाभ, व्हेंडींग स्टॉल अन्य दिव्यांगांच्या विविध योजनांसाठी वापरण्यात आल्याचे सांगितले. पंचायत समिती व ग्रामपंचायत यांच्या पाच टक्के निधी खर्चाबाबतही संबंधित विभागांना सुचना दिल्याचे सांगितले. पंचायत समिती स्तरावर दिव्यांग कक्षात कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण लवकरच घेण्यात येणार असल्याचेही सांगितले. निरामय आरोग्य विमा योजनेसाठी जिल्ह्यातील बौद्धिक दिव्यांग व्यक्तींचा प्रिमीयम जमा करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. 

       वैश्विक ओळखपत्र सुलभपणे दिव्यांगांना मिळण्यासाठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा शल्य चिकीत्सक कार्यालय व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे समन्वय साधून सेवा प्रदान करण्याचा विचार करण्यात आला. शिशु वयोगटातील कर्णबधीरांसाठी कॉक्लिया इंप्लांट सर्जरी करण्यासाठी जिल्हा शल्य चिकीत्सक कार्यालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे सहकार्य मिळण्याबाबतचे हरंगुळ संवेदना प्रकल्पाचे कार्यवाहक सुरेश पाटील यांनी दिले. तसेच अन्य विषयावर या बैठकीत सकारात्मक चर्चा करण्यात आली.  

         कौशल्य विकास विभाग, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील दिव्यांगांसाठी रोजगाराच्या दृष्टीने विविध विषयावर प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात य़ेणार आहे. 

       जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण भागातील दिव्यांगांसाठी वैद्यकीय तपासणी व उपचार शिबीराचे आय़ोजन करण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला. बैठकीच्या शेवटी एैनवेळीच्या प्रश्नांची विषयावर चर्चा करुन निर्णय घेण्यात आला. 

बैठकीच्या प्रारंभी उपस्थितांचे स्वागत झाल्यानंतर मागील बैठकीचे इतिवृत्त वाचून दाखविण्यात आले. प्रत्येक संबंधित विभागनिहाय आढावा सादर करण्यात आला. जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्यावतीने गेल्या वर्षभरामध्ये झालेल्या विविध उपक्रमांचे सादरीकरण करण्यात आले.

                                                        ****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु