वृत्त क्र. : 426 सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचा दौरा कार्यक्रम लातूर, दि. २५ (जिमाका): राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे शुक्रवार, २६ जून २०२६ रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. सहकार मंत्री श्री. पाटील यांचे २६ जून रोजी सकाळी ६.४५ वाजता लातूर येथे आगमन होईल व शिरूर ताजबंदकडे प्रयाण करतील. सकाळी १०.३० वाजता शिरूर ताजबंद येथील इंद्रायणी निवास येथून चाकूर तालुक्यातील वडगाव एक्कीकडे प्रयाण करतील. सकाळी ११ वाजता वडगाव एक्की येथील कै. शिवराज दिगंबर पाटील यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट देतील. सकाळी ११.१५ वाजता चाकूरकडे प्रयाण करतील. सकाळी ११.४५ वाजता चाकूर शासकीय विश्रामगृह येथे राखीव. दुपारी १२ वाजता चाकूर येथे श्री तौफिक शेख यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट देतील. दुपारी १२.१५ वाजता चाकूर येथून लातूरकडे प्रयाण करतील. दुपारी १ वाजता लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समिती बैठकीस उपस्थित राहतील. त्यानंतर लातूर येथून शिरूर ताजबंदकडे प्रयाण करतील. शिरूर ताजबंद येथील इंद्रायणी निवासस्थानी आगमन होईल व राखीव.

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत