पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा लातूर दौरा

वृत्त क्र. : 425 दिनांक : 25 जून,2026 पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा लातूर दौरा लातूर, दि. २५ (जिमाका): राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले हे शुक्रवार, २६ जून २०२६ रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. पालकमंत्री श्री. भोसले यांचे २६ जून रोजी सकाळी ६.४५ वाजता लातूर शासकीय विश्रामगृह येथे आगमन होईल व राखीव. दुपारी १२.४५ वाजता ते लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण करतील. दुपारी १ वाजता लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित जिल्हा नियोजन समिती बैठकीला ते उपस्थित राहतील. त्यानंतर सोयीनुसार मोटारीने लातूर येथून पुणेकडे प्रयाण करतील. ****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास

निलंगा तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालय स्थलांतरीत