Posts

‘एल-निनो’मुळे उद्भवणारी संभाव्य परिस्थिती लक्षात घेवून खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवावी-पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

Image
‘एल-निनो’मुळे उद्भवणारी संभाव्य परिस्थिती लक्षात घेवून खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवावी-पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले • जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक • बियाणे, खते वितरणात सुसूत्रता ठेवावी लातूर, दि. १४ : भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार २०२६ च्या मान्सूनवर 'एल-निनो'चा प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आगामी खरीप हंगामात उद्भवणाऱ्या परिस्थितीवर मात करण्यासाठी आवश्यक सज्जता ठेवावी. तसेच शेतकऱ्यांना पेरणी, बियाणे व खत वापर याविषयी योग्य मार्गदर्शन करावे, अशा सूचना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिल्या. खरीप हंगाम पूर्वतयारीच्या अनुषंगाने आढावा घेण्यासाठी पालकमंत्री श्री. भोसले यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. विधान परिषद आमदार तथा मुख्य प्रतोद विक्रम काळे, खासदार डॉ. शिवाजी काळगे, आमदार रमेश कराड, जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र कदम यांच्यासह पशुसंवर्धन विभाग, अग्रणी बँक, आत्मा, वन आदी विभागा...

भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदासाठी तरुणांना मोफत प्रशिक्षणाची सुवर्णसंधी

भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदासाठी तरुणांना मोफत प्रशिक्षणाची सुवर्णसंधी लातूर, दि. 14 (जिमाका): भारतीय सैन्यदल, नौदल आणि वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना संयुक्त संरक्षण सेवा (सीडीएस) परीक्षेची तयारी करण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे नवयुवक आणि नवयुवतींसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध आहे. नाशिक येथील छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड येथे 15 जून, 2026 ते 28 ऑगस्ट, 2026 या कालावधीत सीडीएस कोर्स क्र. 67 आयोजित करण्यात येत आहे. निवड केलेल्या प्रशिक्षणार्थींनी 14 जून, 2026 रोजी सकाळी 10 वाजता प्रशिक्षण केंद्रावर हजर रहावे. या कोर्सदरम्यान प्रशिक्षणार्थींना मोफत प्रशिक्षण, निवास आणि भोजन सुविधा पुरविल्या जाणार आहेत. लातूर जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी 9 जून, 2026 रोजी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, लातूर येथे मुलाखतीसाठी हजर रहावे. मुलाखतीस येताना उमेदवारांनी सैनिक कल्याण पुणे यांच्या संकेतस्थळावरून (किंवा संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून) सीडीएस-67 कोर्सचे प्रवेशपत्र आणि त्यासोबत असलेल्या परिशिष्टांची प्रिंट भरून सोबत...

मच्छिमारांना साधनांच्या खरेदीसाठी ७५ टक्क्यांपर्यंत शासकीय अनुदान

मच्छिमारांना साधनांच्या खरेदीसाठी ७५ टक्क्यांपर्यंत शासकीय अनुदान लातूर, दि. १४ : मच्छिमारीसाठी लागणाऱ्या साधनांच्या किमतीत दिवसेंदिवस मोठी वाढ होत असल्याने, गरीब मच्छिमारांना आपला व्यवसाय किफायतशीरपणे करता यावा, या उद्देशाने मत्स्यव्यवसाय विभागामार्फत अर्थसहाय्य योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत सहकारी संस्थांच्या सभासदांना आणि वैयक्तिक क्रियाशील मच्छिमारांना मासेमारी साधनांच्या खरेदीवर अनुदान दिले जाणार असून, लातूर येथील मत्स्यव्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त यांनी यासाठी इच्छुक लाभार्थ्यांकडून प्रस्ताव मागविले आहेत. या योजनेमध्ये तयार मासेमारी जाळीसाठी २४ हजार रुपये प्रकल्प किंमत निश्चित करण्यात आली असून, ३० किलो जाळीसाठी अर्थसहाय्य दिले जाईल. तसेच नौका खरेदीसाठी लाकडी नौकेकरिता ६० हजार, स्टील नौकेसाठी ३० हजार, तर फायबर नौकेसाठी १ लाख २० हजार रुपयांची प्रकल्प मर्यादा ठरवण्यात आली असून, यामध्ये राखीव प्रवर्गातील लाभार्थ्यांना ७५ टक्के आणि अराखीव प्रवर्गातील लाभार्थ्यांना ५० टक्के शासकीय अनुदान दिले जाणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थेच...

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत १९ मे रोजी जिल्हास्तरीय विशेष कार्यशाळेचे आयोजन

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत १९ मे रोजी जिल्हास्तरीय विशेष कार्यशाळेचे आयोजन · शासकीय योजनांची मिळणार सविस्तर माहिती लातूर, दि. १४ : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे लातूर जिल्हा कार्यालय, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालय आणि जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मातंग समाजातील १२ पोटजातींमधील बांधवांसाठी १९ मे २०२६ रोजी सकाळी ११ वाजता एक दिवसीय जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा लातूर येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन परिसरातील शासकीय मुलांचे वसतिगृह अभ्यासिका हॉल होणार आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातील मातंग समाजाच्या कल्याणासाठी केंद्र व राज्य शासनामार्फत विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. या योजनांची माहिती समाजातील सर्व घटकापर्यंत पोहोचावी आणि जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, या उद्देशाने या विशेष मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत समाज कल्याण विभाग आणि जिल्हा परिषद समाज कल्याण विभागांतर्गत राबविल्या जाणाऱ्या वि...

लातूर तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीवर महसूल विभागाची कारवाई

Image
    लातूर, दि. १३ : लातूर तालुक्यातील अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्यांवर महसूल विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. मे महिन्यात राबविलेल्या विशेष मोहिमेत बेकायदेशीररीत्या वाळू , दगड आणि मुरूम यांची वाहतूक करणारी एकूण ४ वाहने जप्त करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती लातूरचे तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी सौदागर तांदळे यांनी दिली आहे.   या मोहिमेदरम्यान एकूण ३ हायवा आणि १ टिप्पर या वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. यापैकी एच - २४ बीडब्ल्यू - ७७७३ या हायवा वाहनातून ४ ब्रास वाळूची अवैध वाहतूक केली जात होती. याप्रकरणी संबंधिताकडून ३ लाख १५ हजार ६२० रुपये इतका दंड शासन खाती जमा करण्यात आला आहे. तसेच एमएच - ४२ टी - ०७७५ या हायवा वाहनातून ५ ब्रास मुरूम नेला जात असताना कारवाई करण्यात असून याप्रकरणी २ लाख २९ हजार ७७५ रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.   एमएच - २२ एन - १२५१ या टिप्परवर ३ ब्रास दगडाच्या अवैध वाहतुकीसाठी कारवाई करण्यात आली असून , सध्या या दंडात्मक वसुलीची प्रक्रिया सुरू आहे. तसेच केए - २८ सी - ७३६७ या हायवा वाहनावर ४ ब्...

नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा बोधचिन्हाचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मान्यवरांच्या हस्ते अनावरण

Image
मुंबई, दि.१३ :नाशिक त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा आयोजित होत आहे. या कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचे अनावरण सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कुंभमेळ्याच्या लोगोसाठी कुंभमेळा प्राधिकरणाच्यावतीने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सुमारे तीन हजारांहून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला. या स्पर्धकांमधून तीन उत्कृष्ट स्पर्धकांचा यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये प्रथम क्रमांक पटकावलेल्या पुणे येथील सुमित काटे यांना तीन लाख रुपयांचा धनादेश आणि सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक पटकावलेल्या नोएडा येथील मयांक नायक यांना दोन लाख रुपयांचा धनादेश आणि सन्मानचिन्ह आणि तृतीय क्रमांक पटकावलेल्या पंढरपूर येथील पीयुष पिंपळनेरकर यांचा एक लाख रुपयांचा धनादेश आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. प्रसून जोशी, अश्विनी देशपांडे, मंदार राणे, वृषाली केकणे (देशमुख), बारिश दाते, विनय नारंग, डॉ. प्राजक्ता बास्त...

विशेष लेख: भग्न दगडांपासून अखंड श्रद्धेपर्यंत : सोमनाथची गाथा

  विशेष लेख:   भग्न दगडांपासून अखंड श्रद्धेपर्यंत : सोमनाथची गाथा -           ब्रिजेश सिंह ,  प्रधान सचिव तथा महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय   भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लवकरच ,  १३ नोव्हेंबर १९४७ रोजी तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री आणि उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल सोमनाथ येथे गेले. समुद्रकिनारी उभे राहून त्यांनी मंदिराच्या भग्नावशेषांकडे गंभीर नजरेने पाहिले आणि एक प्रतिज्ञा केली सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाची. तो क्षण म्हणजे भारताच्या सांस्कृतिक पुनर्जागरणाचा पहिला मोठा जागर ;  आपल्या सभ्यतेच्या स्वाभिमानाच्या सार्वजनिक पुनर्प्राप्तीचा क्षण होता.   आणि आता ,  ११ मे रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सोमनाथ अमृत महोत्सवात उपस्थित राहून मंदिराच्या पुनर्स्थापित तेजात सहभाग घेतला ,  तेव्हा तीच प्रतिज्ञा पुन्हा नव्याने प्रज्वलित झाल्यासारखी वाटते. विशेष महापूजा ,  कुंभाभिषेक ,  ध्वजारोहण आणि लाखो भाविकांची उपस्थिती — हे सर्व मिळून भग्नावस्थेतून पुनर्निर्माणाकडे आणि पुनरु...