Posts

Showing posts from September, 2023

क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांचा लातूर जिल्हा दौरा

  क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांचा लातूर जिल्हा दौरा लातूर ,   दि. 28    (जिमाका) :   राज्याच्या क्रीडा व युवक कल्याण विभागाचे मंत्री संजय बनसोडे हे शुक्रवार ,  दि. 29 सप्टेंबर 2023 रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना. बनसोडे यांचे शुक्रवार ,  29 सप्टेंबर ,  2023 रोजी सकाळी 6.30 वाजता लातूर येथे आगमन होईल व शकुंतला निवासस्थान राखीव. सकाळी 9.45 वाजता बार्शी रोडवरील वसंत विहार ,  महाराष्ट्र हाऊसिंग सोसायटी येथे आमदार विक्रम काळे यांच्या निवासस्थानी राखीव . सकाळी 10.15 वाजता मोटारीने धाराशिव जिल्ह्यातील कसबे तडवळेकडे प्रयाण करतील. तेथील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहून सोयीनुसार त्यांचे लातूर येथे आगमन होईल. *****

जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त लातूर येथे रविवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन · सकाळी साडेसहा ते साडेआठपर्यंत आरोग्य तपासणी शिबीर

  जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त लातूर येथे रविवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन ·          सकाळी साडेसहा ते साडेआठपर्यंत आरोग्य तपासणी शिबीर   लातूर ,   दि. 28     (जिमाका) :   दरवर्षी   1   ऑक्टोंबर हा दिवस जागतिक ज्येष्ठ नागरीक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून रविवार, 1 ऑक्टोबर 2023 रोजी लातूर येथील जिल्हा क्रीडा संकुल बहुद्देशीय सभागृहात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. समाज कल्याण सहायक आयुक्त आणि अपोलो मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 6.30 ते 8.30 या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल येथील बहुद्देशीय सभागृहात आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यानंतर सकाळी   11     वाजता याचठिकाणी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त मुख्य कार्यक्रम होईल. जिल्हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी अनमोल सगर ,   समाज कल्‍याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्‍त अविनाश देवसटवार ,   जेष्...

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे मंगळवारी आयोजन

  जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे मंगळवारी आयोजन   लातूर ,   दि. 28     (जिमाका) :    प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हा लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. मात्र, सोमवार, दिनांक 2 ऑक्टोबर, 2023 रोजी महात्मा गांधी जयंती असल्यामुळे लोकशाही दिन पुढील दिवशी म्हणजे मंगळवार, 3 ऑक्टोबर, 2023 रोजी दुपारी 1 वाजता नवीन जिल्हाधिकारी कार्यालय लातूर येथे आयोजित करण्यात आला आहे. ****

सामाजिक अंकेक्षण साधन व्यक्ती नियुक्तीसाठी 5 ऑक्टोबर रोजी मुलाखती

  सामाजिक अंकेक्षण साधन व्यक्ती नियुक्तीसाठी  5 ऑक्टोबर रोजी मुलाखती   लातूर ,   दि. 28     (जिमाका) :   महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनाअंतर्गत ग्राम पातळीवर केलेल्या कामाचे सामाजिक अंकेक्षण करण्यासाठी साधन व्यक्तीची नियुक्ती करण्यासाठी विहीत पात्रता धारण इच्छुक उमेदवारांकडून १५ सप्टेंबर, २०२३ पर्यंत अर्ज मागविण्यात आलेले होते. या पदाच्या मुलाखती 5 ऑक्टोबर, 2023 रोजी होणार आहेत. अर्जाच्या छाननी अंती वैध उमेदवार यांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या  latur.gov.in  या वेबसाइटवर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. या यादीतील वैध उमेदवार यांनी ०५ ऑक्टोबर, 2023 रोजी अनुक्रमांक ०१ ते १५० सकाळी १० वाजता व अनुक्रमांक १५१ ते ३४२ उमेदवार यांनी दुपारी ३ वाजता मुळ कागदपत्रांसह मुलाखतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय, (शाखा - रोहयो) दुसरा मजला हॉल क्रमांक २०७ बार्शी रोड, लातूर येथे अर्धा तास अगोदर उपस्थित राहावे, असे लातूर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पं) आणि उपजिल्हाधिकारी (रोहयो) यांनी कळविले आहे. ****
Image
    जिल्हाधिकारी कार्यालयात दुर्मिळ वृक्ष बियाणे बँकेचे उद्घाटन सर्व शासकीय कार्यालयांमध्ये दुर्मिळ वृक्ष बियाणे बँक तयार करणार -          जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे लातूर ,   दि. 28   (जिमाका) : जिल्ह्यात नैसर्गिक अधिवास असलेले दुर्मिळ वृक्ष वाढावेत, वृक्ष चळवळ लोकचळवळ व्हावी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरपालिका प्रशासन विभागात दुर्मिळ वृक्षांच्या बियाणांची बॅंक सुरू करण्यात आली आहे. राज्यातील हा एक अनोखा उपक्रम असून जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये अशाप्रकारे दुर्मिळ वृक्षांच्या बियाणांची बँक तयार करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरपालिका प्रशासन शाखेने सुरु केलेल्या दुर्मिळ वृक्ष बियाणे बँकेच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे बोलत होत्या. नगरपालिका प्रशासन शाखेचे जिल्हा सहआयुक्त रामदास कोकरे याच्या दालनात सह्याद्री देवराई , द संस्कृती फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या बियाणे बँकेची निर्मिती करण्यात आली आहे...

जिल्हा परिषद पदभरती 2019, 2021 करिता अर्ज केलेल्या उमेदवारांचे परीक्षा शुल्क परत मिळणार

  जिल्हा परिषद पदभरती 2019, 2021 करिता अर्ज केलेल्या उमेदवारांचे परीक्षा शुल्क परत मिळणार §   ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन लातूर ,   दि. 28     (जिमाका) :     ग्रामविकास विभागाचे उपसचिव यांच्या 6 सप्टेंबर, 2023 रोजीच्या पत्रानुसार लातूर जिल्हा परिषदेतंर्गत मार्च 2019 व ऑगस्ट, 2021 (अपंग व इतर सुधारित आरक्षणासह) महाभरती अंतर्गत अर्ज करण्यात आलेल्या उमेदवारांच्या परीक्षा शुल्काची रक्कम परत करण्यात येणार आहे.   याकरिता   https:// maharddzp.com   या संकेतस्थळावर उमेदवारांनी संपूर्ण माहिती भरणे आवश्यक आहे. ही लिंक जिल्हा परिषद लातूरच्या   www.zplatur.gov.in   या संकेतस्थळावर पाहण्यास उपलब्ध आहे.   तरी उमेवारांनी   https://maharddzp. com   संकेतस्थळावर परीक्षा शुल्क परत मिळेण्याबाबत संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरावी, असे आवा‍हन जिल्हा परिषदेच्यावतीने करण्यात येत आहे. ****

औसा येथील पंडीत दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात 58 उमेदवारांची प्राथमिक निवड

Image
  औसा येथील पंडीत दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात 58 उमेदवारांची प्राथमिक निवड लातूर ,   दि. 28     (जिमाका) :   जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि औसा येथील एन बी एस इंस्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक यांच्या संयुक्त विद्यमाने सेवा महिना निमित्त बुधवारी औसा येथे आयोजित पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या रोजगार मेळाव्यात 58 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली. मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी अजीम कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य शेख निजामोद्दीन इसाकउद्दीन, आझाद महाविद्यालयाचे प्राचार्य मासुमदार इलाहीपाशा, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त बालाजी मरे यांची उपस्थिती होती. रोजगार मेळाव्यात लातूर ,   पुणे ,   मुंबई ,   येथील   10 आस्थापना, उद्योजक उपस्थित होते. यावेळी उपस्थित 307 उपस्थित उमेदवारांपैकी 175 उमेदवारांनी   मुलाखती दिल्या. त्यापैकी 58 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली. बेरोजगार युवकांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित करण्यास...

विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा 29 व 30 सप्टेंबर रोजी लातूर जिल्हा दौरा

  विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा 29 व 30 सप्टेंबर रोजी लातूर जिल्हा दौरा              लातूर ,   दि. 27 (जिमाका) :     विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.   नीलम गोऱ्हे   ह्या शनिवार, 29 व 30 सप्टेंबर, 2023 रोजी   दोन दिवसांच्या लातूर   जिल्हा दौऱ्यावर येत   आहेत.   त्यांचे   शुक्रवार,   29 सप्टेंबर, 2023 रोजी रात्री 8.   30 वाजता लातूर   येथे आगमन   होईल.   विधानपरिषद उपसभापती श्रीमती डॉ. गोऱ्हे   ह्या   शनिवार, 30 सप्टेंबर, 2023 रोजी सकाळी 8.30 वाजता   लातूर येथून   किल्लारीकडे   प्रयाण   करतील. सकाळी 9.30 वाजता   त्यांचे   किल्लारी येथे आगमन   होईल.   किल्लारी येथील भूकंपात मृत झालेल्या नागरिकांच्या स्मरणात बांधण्यात आलेल्या स्मारकास अभिवादन   करतील. सकाळी   11.00 वाजता किल्लारी येथे   आयोजित   कृतज्ञता सोहळ्यास उपस्थित   राहतील. दुपारी 12.45 वाजता किल्लारी ...

कंत्राटी क्षेत्रीय अधिकारी तथा तंत्र सहाय्यक पदासाठी 10 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

                                                      कंत्राटी क्षेत्रीय अधिकारी तथा तंत्र सहाय्यक पदासाठी 10 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन                लातूर ,   दि. 27 (जिमाका) :     आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (पीएमएफएमई) या केंद्र पुरस्कृत योजनेतंर्गत जिल्हास्तरावर कृषी व अन्न प्रक्रिया संदर्भातील कामकाज पाहण्यासाठी लातूर जिल्ह्याकरिता एक क्षेत्रिय अधिकारी (फिल्ड लेवल ऑफिसर) तथा तंत्र सहाय्यक (कृषी प्रक्रिया) या कंत्राटी पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदासाठी 10 ऑक्टोबर,  2023 रोजी सायंकाळी 6 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.             क्षेत्रीय अधिकारी (फिल्ड लेवल ऑफिसर) तथा तंत्र सहाय्यक (कृषी प्रकिया) या पदासाठी शैक्षणिक आर्हत...

पाठ्यपुस्तके मंडळाची विभागीय भांडारे 30 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबरपर्यंत बंद राहणार

                                                                                                                                                                पाठ्यपुस्तके मंडळाची विभागीय भांडारे 30 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबरपर्यंत बंद राहणार              लातूर ,   दि. 27 (जिमाका) :     पाठ्यपुस्तके मंडळाच्या विभागीय भांडारांमधील पुस्तके व कागदाची वार्षिक प्रत्यक्ष साठा मोजणी होणार आहे. यासाठी सर्व विभागीय भांडारांमधील व्यवहार 30 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर, 2023 पर्यंत बंद राहणार असल्याचे पुणे पाठ्यपुस्तक मंडळाचे संचालक कृष्णकुमा...

‘अभिव्यक्ती मताची’ स्पर्धेत सहभागी होण्यास मुदतवाढ · मतदार नोंदणीविषयी जनजागृतीसाठी आयोजन

  ‘अभिव्यक्ती मताची’ स्पर्धेत सहभागी होण्यास मुदतवाढ ·          मतदार नोंदणीविषयी जनजागृतीसाठी आयोजन लातूर ,   दि. 26     (जिमाका) :   राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी 1 जानेवारी ,   2024 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुषंगाने लातूर जिल्ह्यातील सर्व पात्र नागरिकांची नावे मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. याविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आयोजित ‘अभिव्यक्ती मताची’   ( व्हॉइस ऑफ वोट) या संकल्पनेवर आधारित जाहिरात निर्मिती ,   पोस्टर आणि घोषवाक्य या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यास 5 ऑक्टोबर 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.   जिल्ह्यातील जनसंज्ञापन व वृत्तपत्रविद्या (मास मीडिया व जर्नलिजम) महाविदयालये आणि सर्जनशील कलाशिक्षण महाविद्यालय (आर्ट कॉलेजस )   मधील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले आहे. ...