गणेशोत्सव स्पर्धेत जास्तीत जास्त मंडळांनी १५ सप्टेंबरपर्यंत सहभाग नोंदवावा-- सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन
गणेशोत्सव स्पर्धेत जास्तीत जास्त मंडळांनी १५ सप्टेंबरपर्यंत सहभाग नोंदवावा-- सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन
मुंबई, दि. ३० : राज्य शासनाने १९ सप्टेंबर २०२३ पासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवात राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त मंडळांनी १५ सप्टेंबर २०२३ पर्यंत आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.
या स्पर्धेसाठी मुंबई, मुंबई उपनगर, पुणे, ठाणे या जिल्ह्यांतून प्रत्येकी ३ व अन्य जिल्ह्यांतून प्रत्येकी एक या प्रमाणे उत्कृष्ट ४४ गणेशोत्सव मंडळांची निवड करण्यात येईल. या ४४ गणेशोत्सव मंडळांमधून राज्यातील पहिल्या क्रमांकाच्या उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळास पाच लाख रुपयांचे, द्वितीय क्रमांकास अडीच लाख रुपयांचे, तर तृतीय क्रमांकास एक लाख रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल. उर्वरित ४१ गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून प्रत्येकी २५ हजार रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येईल.
उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेचे वेळापत्रक
उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेत सहभागी होण्यासाठी गणेश मंडळांना १५ सप्टेंबर २०२३ पर्यंत स्पर्धेत अर्ज करता येईल. mahotsav.plda.@gmail.com
राज्य शासनाच्या www.maharashtra.gov.
*****
Comments
Post a Comment