जिल्हा परिषद पदभरती 2019, 2021 करिता अर्ज केलेल्या उमेदवारांचे परीक्षा शुल्क परत मिळणार

 

जिल्हा परिषद पदभरती 2019, 2021 करिता

अर्ज केलेल्या उमेदवारांचे परीक्षा शुल्क परत मिळणार

§  ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

लातूर, दि. 28  (जिमाका) :  ग्रामविकास विभागाचे उपसचिव यांच्या 6 सप्टेंबर, 2023 रोजीच्या पत्रानुसार लातूर जिल्हा परिषदेतंर्गत मार्च 2019 व ऑगस्ट, 2021 (अपंग व इतर सुधारित आरक्षणासह) महाभरती अंतर्गत अर्ज करण्यात आलेल्या उमेदवारांच्या परीक्षा शुल्काची रक्कम परत करण्यात येणार आहे. याकरिता https://maharddzp.com या संकेतस्थळावर उमेदवारांनी संपूर्ण माहिती भरणे आवश्यक आहे. ही लिंक जिल्हा परिषद लातूरच्या www.zplatur.gov.in या संकेतस्थळावर पाहण्यास उपलब्ध आहे. तरी उमेवारांनी https://maharddzp.com संकेतस्थळावर परीक्षा शुल्क परत मिळेण्याबाबत संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरावी, असे आवा‍हन जिल्हा परिषदेच्यावतीने करण्यात येत आहे.

****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा