पाठ्यपुस्तके मंडळाची विभागीय भांडारे 30 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबरपर्यंत बंद राहणार

 

                                                                                                                            

                                 पाठ्यपुस्तके मंडळाची विभागीय भांडारे

30 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबरपर्यंत बंद राहणार

 

          लातूर, दि. 27 (जिमाका) :  पाठ्यपुस्तके मंडळाच्या विभागीय भांडारांमधील पुस्तके व कागदाची वार्षिक प्रत्यक्ष साठा मोजणी होणार आहे. यासाठी सर्व विभागीय भांडारांमधील व्यवहार 30 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर, 2023 पर्यंत बंद राहणार असल्याचे पुणे पाठ्यपुस्तक मंडळाचे संचालक कृष्णकुमार पाटील यांनी कळविले आहे.

            त्यामुळे गोरेगाव, पुणे, नागरपूर, औरंगाबाद, लातूर, नाशिक, कोल्हापूर, पनवेल व अमरावती येथील विभागीय मंडळातील आवक-जावक, विक्री आदी व्यवहार बंद राहतील, असे श्री. पाटील यांनी कळविले आहे.

****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा