क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांचा दौरा
क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांचा दौरा
लातूर, दि.6 (जिमाका): राज्याच्या क्रीडा व युवक कल्याण, बंदरे विभागाचे मंत्री संजय बनसोडे हे 7 व 8 सप्टेंबर, 2023 रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.
क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना. बनसोडे यांचे 7 सप्टेंबर रोजी सकाळी साडेसहा वाजता लातूरमध्ये आगमन होईल व ‘शकुंतला’ निवासस्थान येथे राखीव. सकाळी अकरा वाजता लातूर येथून उदगीरकडे प्रयाण करतील. दुपारी साडेबारा वाजता त्यांचे उदगीर येथील ओम गार्डन अँड फंक्शन हॉल येथे आगमन होईल. याठिकाणी सिद्धेश्वर गुणवंतराव पाटील यांच्या मुलीच्या साखरपुडा कार्यक्रमास ते उपस्थित राहतील. त्यानंतर उदगीर शासकीय विश्रामगृह येथे राखीव. सायंकाळी साडेपाच वाजता उदगीर येथील हनुमान मंदिर येथे श्री क्षेत्र चंद्रमोळी लिंगेश्वर जागृत महादेव मंदिर श्रावण मासनिमित्त कार्यक्रमास ते उपस्थित राहतील व सोयीनुसार उदगीर येथून लातूरकडे प्रयाण करतील.
ना. बनसोडे हे 8 सप्टेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता लातूर येथील कातपूर रोडवरील पार्वती मंगल कार्यालयात डॉ. रमन रेड्डी यांच्या मुलीच्या साखरपुडा कार्यक्रमास उपस्थित राहतील. दुपारी एक वाजता लातूर येथून मोटारीने उदगीर तालुक्यातील दावणगावकडे प्रयाण करतील. दुपारी सव्वादोन वाजता दावणगाव येथील संत सावता माळी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये श्री संत सावता माळी मूर्ती प्राणप्रतिष्ठा व विठ्ठल रुक्मिणी प्राणप्रतिष्ठाच्या महाप्रसाद कार्यक्रमास ते उपस्थित राहतील. सायंकाळी पाच वाजता ना. बनसोडे हे उदगीर येथील सानेगुरुजी स्मारक विद्यालयाला सदिच्छा भेट देतील. रात्री आठ वाजता उदगीर येथील लक्ष्मी नारायण मंदिर येथे संघर्ष मित्र मंडळ व श्री नवयुवक व्यापारी गणेश मंडळ उत्सव-2023 च्या सार्वजनिक बैठकी उपस्थित राहतील. त्यानंतर सोयीनुसार उदगीर येथून लातूरकडे प्रयाण करतील.
*****
Comments
Post a Comment