‘दिव्‍यांग कल्‍याण विभाग, दिव्‍यांगाच्‍या दारी’ अभियानांतर्गत ‘गुगल फॉर्म’मध्‍ये दिव्यांगांची माहिती सादर करण्याचे आवाहन

                       ‘दिव्‍यांग कल्‍याण विभागदिव्‍यांगाच्‍या दारी’ अभियानांतर्गत

‘गुगल फॉर्म’मध्‍ये दिव्यांगांची माहिती सादर करण्याचे आवाहन


लातूरदि.6 (जिमाका):  दिव्‍यांग कल्‍याण विभागदिव्‍यांगाच्‍या दारी’ या अभियाना अंतर्गत दिव्‍यांग व्यक्तींच्या नाव नोंदणीसाठी ‘गुगल फॉर्म’मध्ये माहिती सादर करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत करण्यात आले आहे.

दिव्यांग व्यक्तींची माहिती शासन स्‍तरावरून दिव्‍यांगाच्‍या कल्‍याण व पुनर्वसनाच्‍या योजनांसाठी आवश्यक आहे. यासाठी लातूर जिल्ह्यातील सर्व दिव्‍यांग व्यक्तींची नोंदणी https://forms.gle/xCFQQCyZeUBsipTt9 या गुगल लिंक वर भरुन सादर करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी यांनी केले आहे.

******

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु