अमृत महोत्सव सप्ताहामध्ये आज ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जनार्दन वाघमारे, इतिहास संशोधक डॉ. सोमनाथ रोडे यांची शुक्रवारी प्रकट मुलाखत

 

अमृत महोत्सव सप्ताहामध्ये आज ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जनार्दन वाघमारे,

इतिहास संशोधक डॉ. सोमनाथ रोडे यांची शुक्रवारी प्रकट मुलाखत

लातूर, दि. 14 (जिमाका): अमृत महोत्सव सप्ताहअंतर्गत हुतात्मा स्मारक येथे  15 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता मराठवाडा मुक्तिसंग्राम समग्र इतिहासया विषयावर ज्येष्ठ साहित्यिक तथा माजी कुलगुरू डॉ. जनार्दन वाघमारे आणि इतिहास संशोधक डॉ. सोमनाथ रोडे यांची प्रकट मुलाखत होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे आणि इतिहास संशोधक विवेक सौताडेकर ही मुलाखत घेणार आहेत.

मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा प्रशासनाच्यावतीने 11 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर 2023 दरम्यान अमृत महोत्सव सप्ताहसाजरा करण्यात येत आहे. या सप्ताहामध्ये मुक्तिसंग्रामाच्या स्मृती जागविण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. वाघमारे, इतिहास संशोधक डॉ. रोडे यांच्या प्रकट मुलाखतीसह याठिकाणी ग्रंथ व दुर्मिळ छायाचित्रे प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा