मंत्रिमंडळ बैठकीत लातूर जिल्ह्याच्या विकासासाठी मोठी तरतूद; क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्याकडून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे आभार
मंत्रिमंडळ बैठकीत लातूर जिल्ह्याच्या विकासासाठी मोठी तरतूद;
क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्याकडून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे आभार
लातूर, दि. 16 (जिमाका) : छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत लातूर जिल्ह्यातील विविध कामासाठी भरीव निधीची घोषणा करण्यात आली आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, बंदरे विकास मंत्री संजय बनसोडे यांनी आभार मानले आहेत.
उदगीर येथे उदयगिरी बाबांच्या समाधीस्थळ विकास आराखड्यासाठी एक कोटीचा निधी देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत बैठकीत झाला. तसेच जळकोट तालुका क्रीडा संकुल विकासासाठी 5 कोटी रुपये आणि उदगीर क्रीडा संकुलासाठी 89 कोटी 56 लक्ष रुपयांच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. उदगीर तालुक्यातील हत्तीबेट येथे पर्यटनस्थळ विकासाठी 5 कोटीचा निधी मिळणार आहे. तसेच उदगीर आणि जळकोट येथे एमआयडीसीला मंजुरी देण्यात आली आहे. उदगीर नगरपरिषदेस नाट्यगृहाच्या बांधकामासाठी रुपये 12 कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे. अहमदपूर आणि उदगीर शहरातील भूमीगत गटार योजना राबविण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. वडवळ नागनाथ येथील संजीवनी बेटाच्या विकासासाठी 5.42 कोटी रुपये निधीला मंजुरी देण्यात आली आहे, अशी माहिती ना. बनसोडे यांनी दिली.
औसा तालुक्यातील मातोळा येथे हुतात्म्यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. लातूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीला मंजुरी देण्यात आली आहे. लातूर-बार्शी-टेंभुर्णी महामार्ग चार पदरी करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच लातूर रस्ते विकास प्रकल्पासाठी 41.36 कोटी रुपये निधीची घोषणा करण्यात आली आहे. नाट्यगृहाचे उर्वरित बांधकाम पूर्ण करण्याकरिता लातूर महानगरपालिकेस रुपये 26.21 कोटी रुपये दिले जाणार आहेत. तसेच अहमदपूर, चाकूर येथे ट्रॉमा केअर सेंटर उभारण्यास मान्यता देण्यात आली असून अहमदपूर तालुक्यातील मन्याड नदीवर 9 कोल्हापुरी बंधारे उभारण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आल्याचे ना. बनसोडे यांनी सांगितले.
*****
Comments
Post a Comment