‘शौर्यगाथा मराठवाडा मुक्तिसंग्रामाची’ व्याख्यानमालेला उत्स्फुत प्रतिसाद
‘शौर्यगाथा मराठवाडा मुक्तिसंग्रामाची’
व्याख्यानमालेला उत्स्फुत प्रतिसाद
• जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालये,
विद्यालयांमध्ये आयोजन
• मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी
वर्षानिमित्त उपक्रम
लातूर, दि.7 (जिमाका): मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा परिषदेचा माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा माहिती कार्यालय आणि बाबासाहेब परांजपे फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शौर्यगाथा मराठवाडा मुक्तिसंग्रामाची’ व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमाले अंतर्गत जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालये, विद्यालयांमध्ये व्याख्यानांचे आयोजन करण्यात येत असून त्याला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
सिंदाळा
येथील नेताजी विद्यालयात ज्येष्ठ साहित्यिक रमेश चिल्ले यांचे व्याख्यान
‘शौर्यगाथा मराठवाडा मुक्तिसंग्रामाची’ व्याख्यानमालेत 6 सप्टेंबर रोजी औसा तालुक्यातील सिंदाळा येथील नेताजी विद्यालयात ज्येष्ठ साहित्यिक तथा व्याख्याते रमेश चिल्ले यांचे व्याख्यान झाले.
शेतकरी, शेतमजूर व बारा बलुतेदार व अठरापगड जातींचे लोक मराठवाडा
मुक्तिसंग्रामात सहभागी झाले होते. हा लढा अन्याय अत्याचाराविरोधात लढलेला लढा
होता, विद्यार्थी महिलांचेही या लढ्यात मोठे योगदान होते. जेंव्हा तळागाळातील लोक
एखाद्या लढ्याचे शिपाई होतात, तेव्हा तो लढा कोणीही थोपवू शकत नाही. तेच चित्र
हैद्राबाद मुक्तीसंग्रामाच्या लढ्याचे होते. मातोळ्याचे क्रांतीकारक दत्तोबा भोसले
यांच्यासारख्या अनेक स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाचा वारसा असलेल्या मराठवाडा
भूमीत आपण रहातो. त्यामुळे मुक्तिसंग्रामाचा इतिहास पुढच्या पिढीला कळवा, यासाठी
जिल्ह्यातील जवळपास सर्वच शाळा कॉलेजमध्ये व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले
असलायचे श्री. चिल्ले यावेळी म्हणाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव श्री. पेठे हे होते. सदस्य शंकर पाटील, मुख्याध्यापक श्री. क्षीरसागर, प्रेमनाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय पाटील, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री. काटे यावेळी उपस्थित होते. सूत्रसंचालन श्री. बिराजदार यांनी केले, श्री. शिंदे यांनी आभार मानले.
रेणापूर
येथील श्री राम विद्यालयात प्रा. श्रीहरी वेदपाठक यांचे मार्गदर्शन
मराठवाडा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित 'शौर्यगाथा मराठवाडा
मुक्तिसंग्रामाची' व्याख्यानमाले अंतर्गत रेणापूर येथील श्री राम विद्यालयात प्रा.
श्रीहरी वेदपाठक यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष देविदास कुपवाड होते.
व्याख्यानमालेचे तालुका समन्वयक वैशाली चव्हाण, प्राचार्य श्री. गोडभरले, मुख्याध्यापक सतीश
मोरे, अमृतेश्वर स्वामी यांची यावेळी उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
महानंदा दरेकर यांनी केले, श्री. मामडगे यांनी आभार मानले. याप्रसंगी शाळेतील सर्व
शिक्षक, प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
सरस्वती
विद्यालयात 'शौर्यगाथा मराठवाडा मुक्तिसंग्रामाची' अंतर्गत व्याख्यान उत्साहात
प्रकाश नगर येथील सरस्वती विद्यालयात मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवानिमित्त ' शौर्यगाथा मराठवाडा मुक्तिसंग्रमाची' व्याख्यानमाले अंतर्गत व्याख्यान आयोजित करण्यात आले. या प्रसंगी व्याख्यानमालेचे समन्वयक दिलीप कानगुले व प्रमुख व्याख्याते प्रा.डॉ.अशोक नारनवरे यांनी विद्यार्थ्यांना मराठवाडा मुक्तिसंग्रामाविषयी माहिती दिली.
मराठवाडा मुक्तिसंग्रामात स्वामी रामानंद तीर्थ, वेदप्रकाश आर्य यांच्यासारख्या अनेक स्वातंत्र्यसैनिकांच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. निझाम, रजाकार यांनी केलेल्या अन्याय अत्याचारावर प्रकाश टाकला. याप्रसंगी मुख्याध्यापक डी. आर. कुलकर्णी, उपमुख्याध्यापक एच. एस. गवळी, पर्यवेक्षक पी.बी. माने, एच.आर.राठोड, एस.एन.मानकोसकर, शिक्षक, शिक्षेकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
****
Comments
Post a Comment