अहमदपूर, जळकोट येथील मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, लामजना येथील शासकीय निवासी शाळेचे आज होणार लोकार्पण
अहमदपूर,
जळकोट येथील मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह,
लामजना येथील शासकीय निवासी शाळेचे आज होणार लोकार्पण
लातूर, दि. 15 (जिमाका) : जळकोट येथील मुलींचे शासकीय वसतिगृह, अहमदपूर येथील मुलींचे शासकीय वसतिगृह आणि औसा
तालुक्यातील लामजना येथील शासकीय निवासी शाळा अशा तीन इमारतींचे लोकार्पण शनिवारी
(दि. 16) सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री गिरीष महाजन, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या
हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे होणार आहे.
या कार्यक्रमाला खासदार सुधाकर श्रृंगारे, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार विक्रम काळे, आमदार सतीश चव्हाण, आमदार सुरेश धस, आमदार रमेश कराड, आमदार अमित देशमुख, आमदार संभाजी पाटील निलंगेकर,
आमदार बाबासाहेब पाटील, आमदार धीरज देशमुख, आमदार अभिमन्यु पवार उपस्थित राहणार आहेत. तरी सामाजिक कार्यकर्ते,
दलितमित्र आणि नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन
समाज कल्याण सहायक आयुक्त एस. एन. चिकुर्ते यांनी केले आहे.
सामाजिक न्याय विभागामार्फत लातूर जिल्ह्यात
25 मुलांची व मुलींचे शासकीय वसतिगृह कार्यरत आहेत. तसेच 6 शासकीय निवासी शाळा
कार्यरत आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त
स्थापित जळकोट येथील 125 मुलींचे शासकीय वसतिगृह आणि अहमदपूर येथील मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या
मागास मुलींचे शासकीय वसतिगृह हे भाडेतत्वावरील इमारतीमध्ये कार्यरत होते. या दोन्ही
वसतिगृहांसाठी नव्याने बांधण्यात आलेल्या शासकीय इमारती, तसेच लामजना येथे सुरु
करण्यात आलेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळेची इमारत अशा
एकूण तीन इमारतींचे लोकार्पण शनिवार होणार आहे.
*****
Comments
Post a Comment