नागरीकानो, पाण्याचा वापर काटकसरीने करा !
नागरीकानो, पाण्याचा वापर काटकसरीने करा !
· लघुपाटबंधारे विभागाचे नागरिकांना आवाहन
· 171 प्रकल्पांमध्ये केवळ 24.12 टक्के पाणीसाठा
· सर्व प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी राखीव; अन्य प्रयोजनासाठी वापरल्यास कारवाई
लातूर, दि. 15 (जिमाका) : जलसंपदा विभागाच्या एकूण 171 प्रकल्पामध्ये सध्या केवळ 24.12 टक्के जिवंत पाणीसाठा उपलब्ध आहे. भविष्यातील निर्माण होणारी पाणी टंचाईची लक्षात घेता जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी जिल्ह्यातील सर्व प्रकल्पातील पाणी हे केवळ पिण्याच्या प्रयोजनासाठी आरक्षित केले आहे. त्यामुळे या सर्व प्रकल्पातील पाण्याचा उपयोग हा केवळ पिण्याच्या पाण्यासाठी करणे अत्यावश्यक असून इतर कोणत्याही प्रयोजनासाठी पाण्याचा वापर करून नये. तसेच नागरिकांनी अतिशय काटकसरीने पाण्याचा वापर करावा, असे आवाहन लातूर पाटबंधारे विभागामार्फत करण्यात आले आहे.
पिण्याच्या प्रयोजनाव्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रयोजनासाठी पाण्याचा वापर होत असल्यास तात्काळ दंडात्मक कार्यवाही करण्यात येणार आहे. पाणी टंचाईची समस्या सोडवण्यासाठी पाण्याचे योग्य नियोजन, वापर होणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन लातूर पाटबंधारे विभाग क्र. 1 व 2 चे कार्यकारी अभियंता यांनी केले आहे.
****
Comments
Post a Comment